क्रिकेटटॉप बातम्या

भारताने विजय मिळवूनही कर्णधार रोहित दु:खीच! म्हणाला, ‘अपेक्षाच नव्हती की, आम्ही 5…’

गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोस येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना पार पडला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दुसरीकडे, भारताने विजय मिळवला असला, तरीही कर्णधार रोहित शर्मा या विजयाने खुश नाहीये. विजयानंतर रोहितने मोठी प्रतिक्रिया दिली.

या सामन्यात 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 5 विकेट्स गमावल्यानंतर म्हटले की, अशा प्रदर्शनाबाबत विचार केला नव्हता. त्याने यावेळी स्वत: आणि विराट कोहली (Virat Kohli) उशिरा फलंदाजी करण्याचा आणि इतर संधी देण्याच्या निर्णयाचाही बचाव केला.

काय म्हणाला रोहित?
सामन्यानंतर रोहित म्हणाला की, “मी कधीच विचार केला नव्हता की, खेळपट्टी अशी असेल. संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची गरज होती. खेळपट्टीत वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी सर्वकाही स्थिर होते. आमच्या खेळाडूंनी त्यांना त्या धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवून चांगले प्रदर्शन केले. आमच्या 5 विकेट्स पडतील, ही अपेक्षा नव्हती.”

‘आता जास्त संधी मिळणार नाही’
सूर्यकुमार यादव याला तिसऱ्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयाचा बचाव करत रोहित म्हणाला की, “मला वाटत नाही की, त्यांना अशाप्रकारच्या जास्त संधी मिळतील.” याव्यतिरिक्त आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात सर्वांना प्रभावित करणाऱ्या मुकेश कुमार याचे रोहितने कौतुक केले. तो म्हणाला की, “मुकेश कुमार चांगली स्विंग करू शकतो. मी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त पाहिले नाहीये. आमच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. तसेच, ईशान किशननेही बॅटमधून चांगले काम केले.”

फिरकीपटूंनी घेतल्या सर्वाधिक विकेट्स
या सामन्यात वेस्ट इंडिज संघ 23 षटकात 114 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांच्या 10पैकी 7 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने 4, तर रवींद्र जडेजाने 3 अशा 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

दुसरीकडे, आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून एकटा ईशान किशन चमकला. त्याने या सामन्यात 46 चेंडूत सर्वाधिक 52 धावा करत अर्धशतक साकारले. तसेच, संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. त्याच्याव्यतिरिक्त इतर 6 भारतीय फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकले नाहीत.

उभय संघातील दुसरा वनडे सामना 29 जुलै रोजी बार्बाडोसच्या याच मैदानावर खेळला जाणार आहे. (skipper rohit sharma not happy with team indias first win against west indies)

महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय! कुलदीप-जड्डूनंतर ईशान चमकला
कुलदीप-जडेजाच्या फिरकी पुढे वेस्ट इंडीजचे लोटांगण, टीम इंडियासमोर विजयासाठी 115 धावांचे आव्हान

Related Articles