ऍडलेडमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा झाला. त्यानंतर आता दुसरा सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथील मैदानावर खेळला जाणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू मायकल बेवन यांनी दुसर्या सामन्यात भारताचा एक अष्टपैलू खेळाडू गेमचेंजर ठरू शकतो, असे म्हटले आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याच्या जागी युझवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळाली होती. दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनफीट होता. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात स्थान दिले नव्हते. मात्र, आता तो फीट आहे आणि दुसर्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. त्याबद्दल बेवन यांनी वक्तव्य केले आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बेवन म्हणाले, “जडेजा एक चांगला खेळाडू आहे. तो खूप उत्साहामध्ये खेळतो आणि त्याच्याकडे अनुभव आहे. तो भारतीय संघासाठी एक मूल्य जोडतो. तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना फलंदाजी व्यतिरिक्त चेंडूने संघाला बरेच काही देऊ शकतो. त्यामुळे पुढच्या सामन्यात भारतीय संघ त्याच्या नावाचा विचार नक्की करेल.”
बेवन जडेजाला म्हणाले गेमचेंजर
मागील काही काळापासून जडेजा स्वतःला फलंदाज म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध करत आहे. चेंडूने नेहमी प्रभावित करणारा जडेजा आता फलंदाजीने सुद्धा भारतीय संघाला सामन्यात विजय मिळवून देत आहे. ज्यामुळे क्रीडा विश्वात त्याच्या नावाची खूप चर्चा केली जाते. याबाबत बेवन म्हणाले, “रवींद्र जडेजा संघाला कशाप्रकारे संतुलन देवू शकतो, हा निर्णय संघ व्यवस्थापकांना घ्यावा लागेल. जडेजाकडे अनुभव उपलब्ध आहे आणि तो संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. तो एक खूप मोठा गेमचेंजर आहे.”
भारतीय संघ करत आहे पुनरागमन करण्याचा विचार
पहिल्या सामन्यात ज्याप्रकारे भारतीय संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता भारताला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली पुनरागमन करायचे आहे. त्यामुळे भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन बदल केले जाऊ शकतात. ज्यामधे केएल राहुल आणि शुबमन गिल यांना संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने उडवली टीम इंडियाची खिल्ली; चाहत्यांनी शिकवला चांगला धडा
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला खेळायचंय आयपीएल
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व