भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) भारतीय संघाच्या (indian cricket team) आतापर्यंतच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आता जडेजाविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जडेजाने मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघासाठी महत्वापूर्ण प्रदर्शन करून दाखवले आहे. त्याने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाला अनेकदा अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढले आहे. भारतीय संघासाठी त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. परंतु मागच्या काही काळापासून सतत त्याच्या फिटनेसविषयी तक्रारी समोर आल्या आहेत आणि आता तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशा बातम्या माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत.
माध्यमांमध्ये अशी चर्चा होत आहे की, रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ इच्छित आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकदरम्यान तो संघातून बाहेर झाला होता. मालितून माघार घेण्यामागे त्याने दुखापतीचे कारण सांगितले होते. आगामी काळात भारताला दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे तो आगामी काळातील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी देखील उपस्थित नसणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, जडेजा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त काळापर्यंत खेळण्याच्या दृष्टीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. अशात जडेजा येत्या काळात पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना दिसेल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ५७ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि यामध्ये २१९५ धावांसह २३२ विकेट्स मिळवल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १६७ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि २४११ धावा केल्या, तसेच १८८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीयमधील त्याच्या कामगिरीचा विचार केला तर, त्यामध्ये त्याने ५५ सामने खेळले आहेत आणि २५६ धावा केल्या आहेत आणि ४६ विकेट्स देखील स्वतःच्या नावावर केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त जडेजाच्या नावावर एक कसोटी शतक देखील आहे. कसोटीमध्ये त्याने १७ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे, तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ अर्धशतके आहेत.
महत्वाच्या बातम्या –
एक कॉल आला अन् दीडतासात विराटच्या कॅप्टन्सीचा गेम खल्लास
विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा, पण वनडे कॅप्टन्सीबद्दल केले धक्कादायक खुलासे
अरर! दुसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी कर्णधार रुटला स्टोक्सनेच केले असते दुखापतग्रस्त, पाहा नक्की काय झाले