---Advertisement---

भावनिक रविंद्र जडेजाने कसोटीतील पहिले शतक केले या व्यक्तीला समर्पित

---Advertisement---

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(5 आॅक्टोबर) दुसऱ्या दिवसाखेर विंडिजने पहिल्या डावात 29 षटकात 6 बाद 94 धावा केल्या आहेत.

तसेच भारताने पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून आज या डावात कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने शतक केले आहे. जडेजाने या सामन्य़ात 132 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 100 धावा केल्या आहेत.

जडेजाचे हे कसोटीतील पहिलेच शतक आहे. त्यामुळे त्याने हे शतक त्याच्या आईला समर्पित केले आहे. याविषयी जडेजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. त्याचा हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

जडेजा म्हणाला, ‘मी हे शतक माझ्या आईला समर्पित करत आहे. कारण तिची इच्छा होती की मी भारतासाठी खेळावे. पण आज ती नाहिये. हे शतक माझ्यासाठी खास आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे जी मी दुसऱ्या कोणाला भेट देऊ शतक नाही. त्य़ामुळे मला हे शतक माझ्या आईला समर्पित करायला आवडेल.’

जडेजाच्या आईचे तो केवळ १७ वर्षांचा असताना निधन झाले होते.

जडेजाने या सामन्यात आज एक विकेट आणि एक धावबादही केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment