भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा मैदानातील उत्कृष्ट श्रेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. त्याने बुधवारी (31 ऑगस्ट) हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात देखील अशाच उत्कृष्ट श्रेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. त्याने मैदानात चपळाई दाखवून हॉंगकॉंगचा कर्णधार निजाकत खान याला पवेलियनमध्ये पाठवले. या उत्कृष्ट थ्रो साठी त्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसते.
निजाकत खान (Nizakat Khan) या सामन्यात एकूण 12 चेंडू खेळला आणि 10 धावा करून विकेट गमावली. सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये हॉंगकॉंगने 2 विकेट्स घमावून 51 धावा केल्या होत्या. सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडू अर्शदीप सिंगने टाकला, तेव्हा स्ट्राईकवर निजाकत खान होता. त्याने हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळला, जिथे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. जडेजाने हा चेंडू क्षणाचाही विलंब न करता पकडला आणि स्टंप्सवर थ्रो केला. त्यावेळी निजाकत एक धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर निघाला होता. क्रीजवर पुन्हा येईपर्यंत जडेजाने स्टंप्स उडवले होते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/irahulchitti/status/1565012551888302081?s=20&t=7456FV4fhlQilZizc-maMQ
तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. विराट कोहली (59*) आणि सूर्यकुमार यादव (68*) यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ 20 षटकांमध्ये 192 धावांपर्यंत मजल मारू शकला. यादरम्यान भारताच्या 2 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. विराट आणि सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी 98 धावांची नाबाद भागीदारी पार पाडली. सूर्यकुमार चांगलाच रंगात दिसला. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक ठोकले. शेवटच्या षटकात सूर्यकुमारच्या बॅटमधून तब्बल 26 धावा निघाल्या.
भारतीय संघाने दिलेले 193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी निघालेला हॉंगकॉंग संघ 20 षटकांमध्ये 152 धांवा करू शकला. परिणामी भारताने हा सामना 40 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला आणि सुपर 4 मध्ये जागा पक्की केली. याआधी आशिया चषकातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट न गमावता विजय मिळला होता. पाकिस्तान संघ जर सुपर 4 मध्ये पोहोचला, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटची हाँगकाँगविरुद्ध भारी खेळी, आशिया चषक 2022मधील पहिले अर्धशतक केल्यानंतर पत्नीची भन्नाट रिऍक्शन
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार
पाकिस्तानविरुद्धच्या मॅच विनर हार्दिकला हाँगकाँगविरुद्ध का केले संघाबाहेर? कारण समजले