रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21व्या सामन्यासाठी समोरासमोर आले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला पहिले दोन बळी लवकर मिळाल्यानंतर रचीन रवींद्र व डेरिल मिचेल यांनी भारतीय संघापुढे आव्हान निर्माण केले. असे असतानाच रवींद्र याला आपल्या डावाच्या सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते. विशेष म्हणजे भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असलेल्या रवींद्र जडेजा याने हा झेल सोडला.
https://www.instagram.com/reel/Cysj0eNPV5P/?igshid=MzRlODBiNWFlZA==
या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे खाते हे न खोलता बाद झाला. त्यानंतर दहाव्या षटकात यंग बाद झाल्यानंतर न्यूझीलंड संघ संकटात सापडला होता. त्यानंतर अकराव्या षटकात भारताला तिसरा बळी घेण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र, जडेजा याने पॉईंटच्या जागेवर रचीन याचा सोपा झेल सोडला. त्यावेळी तो केवळ बारा धावांवर खेळत होता.
Ravindra jadeja dropped the catch of rachin ravindra…!!!
Nahi yaar catches mat chhodo because catches win the matches..!!#ENGvRSA #INDvsNZ #ENGvSA #CWC2023 pic.twitter.com/lpjCnFer3r
— Akash Sinha (@ImAkash50) October 22, 2023
Jadeja dropped Rachin Ravindra pic.twitter.com/hVp2kwfRpW
— Arpit Verma (@Aarycrky) October 22, 2023
रचीन याने आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत 87 चेंडूमध्ये 75 धावांची लाजवाब खेळी केली. दुसरीकडे जडेजा याच्यासाठी हा सामना तितकासा लक्षात राहण्यासारखा ठरला नाही. त्याने टाकलेल्या दहा षटकांमध्ये 48 धावा निघाल्या. यामध्ये त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
(Ravindra Jadeja Drop Rachin Ravindra Catch Against Newzealand)
हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर