दुबई। भारत विरुद्ध स्कॉटलंड संघात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने ८१ चेंडू राखून आणि ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, या सामन्यानंतर एक गमतीशीर घटना पाहायला मिळाली आहे.
या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा सामनावीर ठरला. त्याने या सामन्यात ४ षटकांत १५ धावा देत महत्त्वाच्या ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला भारताच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या शक्यतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, यावर त्याने गमतीशीर उत्तर दिले.
सध्याच्या समीकरणानुसार सांगायचे झाले तर, भारताचा समावेश सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात आहे. या गटातून पाकिस्तानने यापूर्वीच उपांत्य फेरीचे तिकिट बूक केले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आता या गटातून एकच जागा शिल्लक आहे, या जागेसाठी सध्या न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात चूरस आहे, तर स्कॉटलंड आणि नामिबिया या शर्यतीतून आधीच बाद झाले आहेत.
भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचे अखेरचे साखळी फेरीतील सामने बाकी आहेत. यातही न्यूझीलंडचे पारडे जड आहे. कारण, न्यूझीलंडने पहिल्या ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर भारत आणि अफगाणिस्तानने ४ पैकी प्रत्येकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे.
आता रविवारी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या महत्त्वपूर्ण सामना होणार आहे. या सामन्यात जर न्यूझीलंडने बाजी मारली, तर भारत आणि अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपेल आणि न्यूझीलंड गुणांच्या आधारे उपांत्य फेरीत जागा पक्की करेल. पण, जर न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागले आणि भारताने अखेरच्या सामन्यात नामिबियाला पराभूत केले, तर न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील चांगला नेटरनरेट असलेला संघ उपांत्य फेरी गाठेल.
जडेजाचे गमतीशीर उत्तर
याच समीकरणाबद्दल एका पत्रकाराने जडेजाला प्रश्न विचारला की, ‘जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवला, तर आपल्याला (भारतीय संघासाठी) फायद्याचे आहे, असे बोलले जात आहे. पण, जर न्यूझीलंड अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाले नाही तर काय?’
जडेजाने या प्रश्नावर मजेशीर आणि लगेचच उत्तर दिले की, ‘तर मग… बॅग पॅक करणार आणि घरी जाणार, अजून काय?’
— Hassam (@Nasha_e_cricket) November 5, 2021
जडेजाच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
"Toh phir aur bag pack karke ghar jayenge, aur kya"😂🤣 pic.twitter.com/V6DE71UcM0
— maddy (@224notout) November 5, 2021
दरम्यान, या सामन्यात भारताने स्कॉटलंडला १७.४ षटकांत ८५ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर ८६ धावांचा पाठलाग भारताने ६.३ षटकांत २ विकेट्स गमावत पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलचा धमाका! केवळ १८ चेंडूत अर्धशतक करत ‘या’ विक्रमात मिळवले युवराजनंतर दुसरे स्थान
वाढदिवशी विराटने जिंकला टॉस अन् नावावर झाला अनोखा विक्रम; रिचर्ड्स, स्मिथच्या पंक्तीत सामील
टी२० विश्वचषक: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंडचा मार्ग सुकर, नामिबियाचा केला ५२ धावांनी पराभव