आयपीएलच्या गुणतक्यात शेवटच्या २ क्रमांकावर असलेले चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ सोमवारी (१९ ऑक्टोबर) आमने सामने आले होते. या करो या मरो सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी प्रयत्नशील राहिलेला चेन्नई संघ अखेर ७ विकेट्सने पराभूत झाला. दरम्यान राजस्थानच्या जोस बटलरने मारलेला मॅच विनिंग षटकार अडवण्यासाठी रविंद्र जडेजाने खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्याच्या हाती अपयश आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या खेळाडूंचा चांगलाच समाचार घेत त्यांना २० षटकात ५ विकेट्सच्या नुसकानावर फक्त १२५ धावा करु दिल्या. प्रत्युत्तरादाखल सुरुवातीच्या ५ षटकात चेन्नईनेही राजस्थानच्या ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पण त्यानंतर फलंदाजीला आलेला राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलरने मिळून राजस्थानचा विजय साकारला. या दोन धुरंधरांनी मिळून १६व्या षटकापर्यंत संघाचा स्कोर ११२ धावांवर आणला. आता त्यांना ४ षटकात १४ धावा करायच्या होत्या. म्हणून आक्रमक फलंदाजी करत सामना खिशात घालण्याच्या हेतूने बटलरने १७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जोरदार शॉट मारला.
पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या जडेजाने तो शॉट रोखण्यासाठी हवेत उंची उडी घेतली. त्यामुळे त्याच्या हातात चेंडू आलादेखील होता. पण त्याला स्वत:चा तोल सावरला नाही आणि चेंडू हातात पकडूनच सीमारेषेच्या बाहेर पडला आणि राजस्थानच्या खात्यात षटकाराची नोंद झाली.
Ravindra Jadeja of Chennai Superkings takes a catch of Jos Buttler of Rajasthan Royals but crosses the boundary during match 37 of season 13 . great .. pic.twitter.com/Gd8rRhLhFF
— Bilal Yasir (@BilalYasirBjr) October 20, 2020
अशाप्रकारे केवळ १७.३ चेंडूत राजस्थानने १२६ धावा करत चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ रांगतही नव्हता तेव्हा वाॅटसनने सुरू केलेलं क्रिकेट, आज त्यानेच केली ‘दांडी गुल’
धोनी रिव्ह्यू सिस्टिम पुन्हा ऍक्टिवेट- पाहा कशी वाचवली अंबाती रायडूची विकेट
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’