---Advertisement---

रवींद्र जडेजाच्या आयुष्यात नव्या मित्राचे आगमन, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 4:18 PM
Ravindra Jadeja
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत  (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja)  भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. तो सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दरम्यान संघाबाहेर असताना देखील तो एका फोटोमुळे चर्चेचा विषय ठरतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक रवींद्र जडेजाला एक मित्र भेटला आहे. तो आपल्या मित्रासोबत फक्त वेळ घालवत नाहीये तर, त्याने त्याच्यासोबत फोटो देखील शेअर केला आहे. त्याने मंगळवारी (४ जानेवारी ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सांगाड्याच्या खांद्यावर हात ठेऊन उभा आहे. (Ravindra jadeja Tweet )

रवींद्र जडेजा सध्या बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये आहे. तो रिहॅब प्रक्रियेसाठी इथे दाखल झाला आहे. यादरम्यान तो कसून सराव देखील करत आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर सांगाड्या सोबत दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने “किटो डायट नंतरचा मित्र” असे लिहिले आहे.

किटो डायट म्हणजे काय?
किटो डायट खूप कठीण असते. याच डायटचा हेतू शरीरातील फॅट कमी करण्याचा असतो. अनेक दिग्गजांनी असेही म्हटले आहे की, या डायटमुळे तुम्हाला अनेक आजार देखील होऊ शकतात. ब्लड प्रेशर कमी होणे, सर्दी तसेच हृदयाशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. या डायटचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो.

रवींद्र जडेजा सध्या वर्तमान क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. हे त्याने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात दाखवून दिले आहे. तसेच तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. ज्यामुळे वाढतं वजन त्याच्या अडचणीत वाढ करू शकते. हेच कारण आहे की, तो वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.

महत्वाच्या बातम्या :

जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

पहिल्या वनडेला एक्कावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---