---Advertisement---

IPL: जडेजाची आयपीएलमध्ये मोठी कामगिरी! धोनी-कोहलीच्या खास क्लबमध्ये एँट्री

---Advertisement---

आयपीएलच्या 18व्या हंगामातील 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) आमने-सामने आहेत. चेन्नईच्या चेपॉकवर होणाऱ्या या सामन्यात पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात खेळण्यासाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानावर येताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला. खरं तर, जडेजा आता आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा पाचवा खेळाडू बनला आहे.

डावखुरा अष्टपैलू जडेजा आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा जगातील पाचवा खेळाडू बनला आहे. तो एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या दिग्गजांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनी (274*) च्या नावावर आहे. या यादीत रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 266 सामने खेळले आहेत. विराट कोहली (262) आणि दिनेश कार्तिक (257) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे टॉप-5 खेळाडू

274* – एमएस धोनी
266 – रोहित शर्मा
262 – विराट कोहली
257 – दिनेश कार्तिक
250* – रवींद्र जडेजा

2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून जडेजा एकूण 4 संघांकडून खेळला आहे. सीएसकेसाठी हा त्याचा 182वा सामना आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 27, गुजरात लायन्ससाठी 27 आणि कोची टस्कर्स केरळसाठी 14 सामने देखील खेळले आहेत. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 250* सामन्यांमध्ये 3,142 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत 166 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेच्या इतिहासात 3,000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 150 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---