---Advertisement---

RCB vs CSK: जडेजानं हणला 109 मीटरचा षटकार, चेंडू मैदानाबाहेर! पाहा VIDEO

On: रविवार, मे 4, 2025 10:27 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 52व्या सामन्यात मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीने 2 धावांनी विजय मिळवला, परंतु या सामन्यात सीएसकेच्या 2 खेळाडूंनी निश्चितच आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. यामध्ये एक नाव 17 वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेचे आहे. ज्याने 94 धावांची खेळी खेळली, तर दुसरे नाव अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाचे आहे, ज्याने 45 चेंडूत 77 धा-वांची खेळी खेळली, जरी दोन्ही खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याच्या खेळीदरम्यान जडेजाने असा शॉट मारला की चेंडू थेट चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावर पडला. जडेजाने 109 मीटर लांब षटकार मारला

रवींद्र जडेजाने एक मोठा आणि लक्ष वेधून घेणारा षटकार मारला. 214 धावांचा पाठलाग करत असलेल्या चेन्नईच्या डावातील 17 व्या षटकात, लुंगी एन्गिडीने टाकलेला फुल-टॉस चेंडू जडेजाने जोरात मारला. चेंडू थेट स्क्वेअर लेगच्या दिशेने उडत गेला आणि स्टेडियमच्या छतावर आदळला.

हा षटकार 109 मीटर लांब गेला, शिवाय आयपीएल 2025 मधील सर्वात लांब षटकार ठरला. याआधी हेनरिक क्लासेन आणि आंद्रे रसेलने लांब षटकार मारले होते, पण जडेजाने त्यांनाही मागे टाकले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून जडेजाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

आयपीएल 2025 हंगामातील सर्वात लांब षटकार मारणारे खेळाडू

रवींद्र जडेजा – 109 मीटर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
हेनरिक क्लासेन – 107 मीटर विरुद्ध मुंबई इंडियन्स
आंद्रे रसेल – 106 मीटर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
अभिषेक शर्मा – 106 मीटर विरुद्ध पंजाब किंग्ज
फिल साॅल्ट – 105 मीटर विरुद्ध गुजरात टायटन्स

चेन्नई सुपर किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध 2 धावांच्या फरकाने पराभव झाला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतचा धावांच्या फरकाने हा त्यांचा तिसरा सर्वात लहान पराभव आहे. सीएसकेने 2019 च्या आयपीएल हंगामात आरसीबीविरुद्धचा सामना एका धावाच्या फरकाने गमावला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---