सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मालिका मध्येच रद्द करण्याात आली होती. सा मालिकेत उरलेली पाचवी कसोटी सध्या सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने अवघ्या ९८ धावांत ५ गडी गमावले. त्यानंतर उपकर्णधार रिषभ पंत अन् अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांनी डाव सावरला. रिषभ पंतने शतकी खेळा केल्यानंतर या सामन्यात रविंद्र जडेजानेही शतक झळकावले.
CENTURY for @imjadeja 👏👏
This is his third 💯 in Test cricket 👌👌
LIVE – https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/10LrrWiuVB
— BCCI (@BCCI) July 2, 2022
काल सुरू झालेल्या पाचव्या कसोटीत सुरुवातील भारताच्या टॉप ४ फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर रिषभ पंतने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत डाव सावरला. नंतर रविंद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. रिषभ पंतने शतक झळकावत पहिल्या दिवशी भारताला ३३८ धावांपर्यंत पोहचवले. मात्र, रिषभ पंत १४८ धावांवर बाद झाल्यानंतर जडेजाने मोहम्मद शामी चा हात हातात घेत भारताची स्थिती सुधरवली. शिवाय शतक झळकावत एजबैस्टनच्या मैदानावर शतक झाळकावणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, या सामन्यात सध्या भारतीय संघाने पहिल्या ८० षटकात ३७० धावांचा पल्ला गाठला आहे. सद्या भारताने ८ गडी गमावले असताना जडेजा आणि कर्णधार बुमराह फलंदाजी करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’
आता ‘पंड्या पॉवर’ काऊंटी क्रिकेटमध्येही गाजणार! ‘हे’ दोन भारतीयही होणार सहभागी
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल