भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा क्रिकेटव्यतिरिक्त आपल्या इतर कौशल्यांसाठीही ओळखला जातो. भर मैदानात तो बॅटने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवत असतो. यासोबतच जडेजा घोड्यांवर किती प्रेम करतो हे देखील सर्वांना माहीत आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी तसेच कसोटी मालिकेला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी आपल्या एका कौशल्याला धार लावता ना दिसून आला. याचा एक व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
जडेजा देतोय या कौशल्यावर भर
रवींद्र जडेजा हा घोड्यांवर विशेष प्रेम करतो. आपल्या फार्महाऊसवर त्याने खास घोड्यांसाठी ‘स्टड फार्म’ बनवले आहे. फावल्या वेळात तो या घोड्यांना स्वत: धुण्यापासून फेरफटका मारण्यापर्यंत कामे करतो. जडेजाने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो घोडेस्वारी करताना दिसतोय. या व्हिडिओला त्याने कॅप्शन देताना लिहिले, ‘मी माझ्या घोडेस्वारी कौशल्याला धार देतोय.’
https://twitter.com/imjadeja/status/1395293464175292426
त्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. इतर चाहत्यांप्रमाणे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने देखील या पोस्ट खाली कमेंट करताना लिहिले, ‘लव ईट रॉकस्टार!’ वॉनच्या या कमेंटवर चाहत्यांच्या काही मजेदार प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे जडेजा
मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला जडेजा दुखापतीमुळे मुकला होता. मात्र, त्यानंतर आयपीएल २०२१ त्याने आपला शानदार फॉर्म दाखवला. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने दिमाखदार कामगिरी केली. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो खेळताना दिसेल. यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत देखील तो भारताचे प्रतिनिधित्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कमालच! ‘गब्बर’ शिखर धवनचा दिसला अनोखा अंदाज, बासरी वाजवतानाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
वर्ल्डकप २०२२ च्या क्वालिफायरसाठी भारतीय फुटबॉल संघ पोहचला दोहा येथे; सुनील छेत्रीचे पुनरागमन






