---Advertisement---

वर्ल्डकप २०२२ च्या क्वालिफायरसाठी भारतीय फुटबॉल संघ पोहचला दोहा येथे; सुनील छेत्रीचे पुनरागमन

On: शनिवार, मे 22, 2021 12:13 AM
---Advertisement---

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघ बुधवारी संध्याकाळी दोहा येथे पोहचला आहे. दोहा येथे भारतीय संघ आगामी 2022 फिफा वर्ल्डकपसाठीचे क्वालिफायर सामने आणि 2023 मध्ये होणाऱ्या आशियाई चषक पात्रता फेरीचे उर्वरित सामने खेळणार आहे.

छेत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्चमध्ये युएई आणि ओमान विरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता. पण, यजमान कतार विरुद्ध जूनमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी तो सज्ज झाला आहे. भारतीय संघ दोहाच्या बायो-बबल मध्ये सराव शिबिरात भाग घेईल.

कतारच्या दौऱ्यासाठी आवश्यक हेल्थ प्रोटोकॉलनुसार, कोरोनाच्या आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल घेऊन 48 तासात सर्व खेळाडू आणि कर्मचारी तिथे पोचणार आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे खेळाडू 15 मेपासून राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे बायोबबलमध्ये राहत होते.

एफसी गोवाचा मिडफिल्डर ग्लेन मार्टिन्स हा संघातील एकमेव नवीन खेळाडू आहे. उदांत सिंग, ब्रॅंडन फर्नांडिज, प्रणय हळदार आणि अब्दुल सहल यांनीही राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. मार्चमध्ये भारतीय संघाच्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी 27 सदस्यीय संघात असलेले मिडफिल्डर्स जॅक्सन सिंग, रेनिअर फर्नांडिज आणि हलीचरण नारजारे यांच्यासह हितेश शर्मा यांना संघातून वगळण्यात आले आहे. राहुल भेके, नरेंद्र गहलोत आणि शुभशीष बोस बचावफळीत आहेत. त्याच वेळी, आशुतोष मेहता, मंदिर राव देसाई आणि मसूर शरीफ हे देखील जागा मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

भारतीय संघात पुढील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
बचावफळी: प्रीतम कोटल, राहुल भेके, नरेंद्र गहलोत, चिंगलेनसाना सिंह, संदेश झिंगन, आदिल खान, आकाश मिश्रा, शुभशीष बोस.
गोलकीपर: गुरप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरज सिंग.
मिडफील्डर्स: उदंतसिंग, ब्रॅंडन फर्नांडिज, लिस्टन कोलाको, रॉलिन बोर्जेस, ग्लेन मार्टिन्स, अनिरुद्ध थापा, प्रणय हॅल्दर, सुरेश सिंग, लल्लेन्ग्माव्हिया राल्टे, अब्दुल साहल, यासिर मोहम्मद, ललिझान्युआला चांगटे, बिपिन सिंग, आशिक कुरुनियन.
फॉरवर्डः ईशान पंडित, सुनील छेत्री, मनवीर सिंग

असा असेल भारतीय संघाचा कार्यक्रम
03 जून, भारत विरुद्ध कतार , रात्री 10.30 वाजता
07 जून ,भारत विरुद्ध बांगलादेश, 07.30 वाजता
15 जून ,भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 07.30 वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

दोन देशांसाठी खेळणारा क्रिकेटपटू झाला निवृत्त; भारताविरुद्ध मात्र मिळाला नाही एकही बळी

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये पुन्हा वर्णद्वेष! ग्रॅमी स्मिथवर लावले गेले गंभीर आरोप, तर एबी डिविलियर्स…

‘तो’ स्कूप शॉट पाहून माजी भारतीय क्रिकेटपटूने म्हटले ‘तो यह भी बॉस है’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---