दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज लोनवाबो त्सोत्सोबेने माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथवर मोठा आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या, ग्रॅमी स्मिथवर त्सोत्सोबेने वर्णद्वेष केल्याचा ठपका ठेवला. दक्षिण आफ्रिका संघात कृष्णवर्णीय यष्टीरक्षकाला स्थान दिल्यास आपण निवृत्त होवू, अशी धमकी स्मिथने दिली होती, असे त्सोत्सोबेने म्हटले आहे.
कानपूर येथे २००४ साली भारताविरुद्ध पदार्पण करणारा यष्टीरक्षक थामी सोलेकिले हा दक्षिण आफ्रिकेचा भविष्यातील एक मोठा खेळाडू मानला जात होता. मात्र तो केवळ तीन कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करू शकला. त्याने १६० प्रथमश्रेणी सामन्यांत ३०.४३ च्या सरासरीने सहा शतकांसह ५८४४ धावा बनविण्याचा पराक्रम केला होता. त्सोत्सोबेच्या म्हणण्यानुसार, २०१२ मध्ये मार्क बाऊचरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी यष्टीरक्षक म्हणून सोलेकिलेची निवड झाली होती. मात्र, अचानकपणे ही जागा एबी डिव्हिलियर्सला देण्यात आली.
डेल स्टेन व मॉर्ने मॉर्कल यांच्या साथीने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान मार्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्सोत्सोबेने म्हटले आहे की,
“सोलेकिले बाऊचरची जागा घेण्याची सज्ज होता. परंतु अचानकपणे डिव्हिलियर्सला बाऊचरचा पर्याय म्हणून म्हणून नेमण्यात आले. यष्टीरक्षक एक तज्ञ खेळाडू असतो. जो डिव्हिलियर्स नव्हता. डिव्हिलियर्सची यष्टिरक्षक म्हणून निवड अपारदर्शक होती. खरेतर, स्मिथला संघात कृष्णवर्णीय खेळाडू नको होता. सोलेकिलेला संघात घेतल्यास आपण निवृत्ती घेऊ असेदेखील स्मिथ म्हटलेला.”
स्मिथने या आरोपांचे जोरदारपणे खंडन केले आहे. त्यावेळी यष्टीरक्षकासाठी स्पर्धा होती आणि आपण उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम पर्याय निवड समितीला दिलेला, असे स्मिथने म्हटले.
अशी आहे त्सोत्सोबेची कारकीर्द
लोनवाबो त्सोत्सोबेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे ५ कसोटी, ६१ वनडे व २३ टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे ९, ९४ व १८ बळी आपल्या नावे केले. एका स्थानिक स्पर्धेत मॅच फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर आठ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडमध्ये होणार आयपीएलचे आयोजन? बोर्डाने दिली ‘ही’ माहिती
‘तो’ स्कूप शॉट पाहून माजी भारतीय क्रिकेटपटूने म्हटले ‘तो यह भी बॉस है’
परफेक्ट जोडी! दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर आपल्या ‘खास’ मित्रासोबत घालवतोय वेळ, बघा फोटो