बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. बांगलादेश दौऱ्यात कसोटी आणि वनडे संघात त्याला जागा मिळाली, मात्र फिट नसल्याने तो दौऱ्यावर गेला नाही. यामुळे तो दोन्ही मालिकांमधून बाहेर झाला. आता तो संघात परतण्यासाठी आतुर असून त्याने बेंगलोर गाठले आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये पोहोचला आहे.
श्रीलंका संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरूवात टी20 मालिकेने होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा झाली नसून यामध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) खेळू शकतो, जर तो पूर्णपणे फिट असला तरच. यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये गेला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये तो बेंगलोरमध्ये असल्याचे लिहिले आहे. त्याने फिटनेस टेस्टमध्ये पास केली तर तो लवकरच भारताच्या संघात परतणार आहे.
जडेजाला टी20 विश्वचषकाच्या संघातही जागा मिळाली होती, मात्र दुखापतीमुळे तो त्या स्पर्धेतूनही बाहेर झाला होता. त्या स्पर्धेत त्याच्या अनुपस्थितीचे परिणामही दिसले. त्यानंतर भारताने बांगलादेशचा दौरा केला. ज्यामध्ये त्याला वनडे आणि कसोटी संघात स्थान मिळाले, मात्र पुन्हा एकदा तो बाहेर झाला. यादरम्यान तो त्याची पत्नी रिवाबा जडेजा हिच्यासाठी राजकिय प्रचार करताना दिसला. आता तो राजकिय स्थितीतून बाहेर झाला असून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबई येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 5 जानेवारीला पुणे आणि 7 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकाता आणि तिसरा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे खेळले जाणार आहेत. Ravindra Jadeja may return in Indian team Against Sri Lanka Series
जडेजाने भारतासाठी आतापर्यंत 60 कसोटी, 171 वनडे आणि 64 टी20 सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयला नेहमी नडणाऱ्या पीसीबी अध्यक्षांची हाकालपट्टी, ‘हा’ व्यक्त बनला नवा कारभारी
अर्जुन तेंडुलकरचा वेगवान चेंडू गोळीसारखा आला अन् फलंदाजाच्या दांड्या उडवून गेला