भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला नाही. फिटनेसच्या कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अनेकांच्या मते रविंद्र जडेजा या सामन्यात खेळत असता, तर सामन्याच्या निकाल वेगळा असू शकत होता. उभय संघांतील दुसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात जडेजा खेळणार की नाही, याविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील कसोटी मालिका मंगळवारी (26 डिसेंबर) सुरू झाली. बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) 2023 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो संघाला आपली सेवा देऊ शकला नाही. पाठीच्या वेदनेमुळे जडेजा सेंच्युरियनमध्ये झालेल्या या कसोटीत खेळताना दिसला नाही. असे असले तरी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जडेजाचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये हा सामना खेळला जाणार आहे.
माध्यमांतील वृत्तांवुसार जडेजाने नुकताच सराव सत्रात भाग घेतला होता. संघातील इतर खेळाडूंसोबत अष्टपैलूनेही चांगलाच घाम गाळल्याचे समजते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविंद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार सराव सत्रात जडेजा कुठल्याचे वेदनेत दिसला नाही. यावेळी भारतीय संघाचे हेल्थ एँड कंडिशनिंग कोच त्याच्यावर लक्ष ठेवून होते.
जडेजाने 2023 मध्ये एकूण कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 35 सामने खेळले. यात त्याला 66 विकेट्स मिळाल्या, ज्या वर्षभारतील भारतासाठी सर्वाधिक आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे. कुलदीपने 2023 मध्ये 39 सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत. (Ravindra Jadeja may return to the Indian squad for the Cape Town Test)
महत्वाच्या बातम्या –
आरसीबीने ड्रॉप केलेला स्टार अष्टपैलू बनला श्रीलंकेचा कर्णधार, वाचा कधी करणार पुनरागमन
AUS vs PAK । पॅट कमिन्सचा कसोटी क्रिकेटमध्ये धमाका, महान गोलंदाजांमध्ये बनवले स्वतःचे वेगळे स्थान