भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्याच जडेजा मोठ्या काळानंतर भारतीय जर्तीत दिसला आणि या दोन्ही सामन्यामध्ये मॅच विनर ठरला. उभय संघांतील तिसरा कसोटी सामना इंदौरचा होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 1 मार्च रोजी सुरू होणाऱ्या सामन्यात जडेजाकडे क्रिकेट इतिहासात कपिल देवसारखी कामगिरी करण्याची मोठी संधी असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने 1 डाल आणि 132 धावांनी जिंकला. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला गेला, जो भारतीय संघाने 6 विकेट्स राखून नावावर केला. तिसऱ्या कसोटी सामन्यात जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर संघासाठी ही विजय खूपच महत्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सामन्यातून भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखीच कामगिरी नाववर करू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी जडेजाला अजून फक्त एक विकेट घ्यावी लागणार आहे.
जडेजाच्या नावावर सध्या 259 कसोटी विकेट्स आहेत. अजून एक कसोटी विकेट जर त्याला मिळाली, तर मोठा विक्रम जडेजाच्या नाववर होईल. जडेजा या एका विकेटज्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या 500 विकेट्स पूर्ण करेल. असात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स आणि 5000 धावा करणारा कपिल देव (Kapil Dev) यांच्यानंतर जडेजा दुसरा भारतीय खेळाडू असेल. कपिल देव यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 131 कसोटी सामने खेळले, ज्यात 5248 धावा केल्या 434 विकेट्सही घेतल्या. वनडे क्रिकेटमध्ये माजी कर्णधाराने 225 सामन्यात 3783 धावा आणि 253 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जडेजा देखील कपिल देवनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय बनेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. जडेजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 62 कसोटी, 171 वनडे आणि 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात तिन्ही फॉरमॅटमध्ये जडेजाच्या नावावर अनुक्रमे 2619, 2447 आणि 457 अशा धावांची नोंद आहे. गोलंदाजाच्या रूपात जडेजाने या फॉरमॅट्समध्ये 259, 189 आणि 51 अशा विकेट्स घेतल्या आहेत. (Ravindra Jadeja needs just one wicket to join Kapil Dev’s exclusive club)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?
बुमराहचे करियर धोक्यात! आता आयपीएल खेळण्यावरही प्रश्नचिन्ह, WTC फायनलसाठी राहणार अनुपलब्ध?