इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडू जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, वेगवान गोलंदाज आणि प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी सुरुवातीचे २ दिवस गाजवले आहे. त्यातही जडेजाने दमदार शतक ठोकत पुनरागमन केले आहे. यानंतर आता जडेजाने आयपीएलमधील कर्णधारपदाच्या विवादाबद्दल मौन सोडले आहे.
आयपीएल २०२२ पूर्वी (IPL 2022) एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके, CSK) नेतृत्त्वपद सोडले होते. त्यानंतर सीएसकेचा अनुभवी खेळाडू जडेजाकडे (Ravindra Jadeja) संघाचे नेतृत्त्वपद सोपवण्यात आले होते. परंतु त्याला कर्णधार म्हणून संघाला जास्त यश मिळवून देता आले नव्हते. त्यामुळे हंगामाच्या अर्ध्यातून पुन्हा एकदा धोनीने सीएसकेची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर जडेजाला खेळाडू म्हणूनही संघात घेतले गेले नव्हते.
आता इंग्लंडविरुद्ध शतक केल्यानंतर (Ravindra Jadeja Century) जडेजाने आयपीएलमधील विवादाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जडेजाने म्हटले की, तो या घटनेतून पुढे गेला आहे. सध्या तो त्याचे संपूर्ण लक्ष भारताकडून चांगले प्रदर्शन करण्यावर देत आहे.
जडेजा म्हणाला की, “जे झाले, ते झाले. इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करताना आयपीएलमधील गोष्टी माझ्या डोक्यात नव्हत्या. जेव्हा तुम्ही भारतीय संघाकडून खेळता, तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष भारतीय संघावरच असले पाहिले. माझ्यासाठीही असेच होते. भारतीय संघासाठी दमदार प्रदर्शन करण्याइतके समाधान इतर कोणत्या गोष्टीत नाही.”
इंग्लंडमध्ये शतक करणे मोठी गोष्ट
जडेजाने पुढे म्हटले की, “भारताबाहेर खासकरून इंग्लंडमध्ये शानदार प्रदर्शन करणे वास्तवात खूप मोठी गोष्ट आहे. एका खेळाडूच्या रूपात शतक करणे खूप मोठी गोष्ट आहे. मी वास्तवात एक खेळाडू म्हणून स्वत:च स्वत:कडून आत्मविश्वास मिळवू शकता. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये शतक केल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडतो. मला खरोखरच खूप चांगले वाटत आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत
अठरा वर्षे भारतीय संघाची सेवा केल्यानंतर कार्तिककडे नेतृत्त्वपद; भावूक ट्वीट करत म्हणाला, ‘गर्व आहे’
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या रोहित कधी होतोय टीम इंडियात सामील