आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच खेळाडूंची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली. श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत आपल्या शानदार अष्टपैलू खेळाने भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला या सामन्यातील कामगिरीचा फायदा यासह तो अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आला आहे. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व रिषभ पंत यांना देखील नव्या क्रमवारीत फायदा झाला.
— ICC (@ICC) March 9, 2022
पहिल्या स्थानी पोहोचला जडेजा
मोहाली कसोटी रवींद्र जडेजा याच्यासाठी खास राहिली. त्याने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. त्याने नाबाद १७५ धावा ठोकल्या. सोबतच गोलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून नऊ बळी त्याने आपल्या नावे केले. यासह तो तब्बल पाच वर्षांनंतर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आला आहे. २०१९ पासून पहिल्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डर याला त्याने खाली खेचले.
Jadeja reaches the summit 👑
Kohli, Pant move up ⬆️Some big movements in the latest update to the @MRFWorldwide ICC Men's Test Player rankings 📈
Details 👉 https://t.co/BjiD5Avxhk pic.twitter.com/U4dfnrmLmE
— ICC (@ICC) March 9, 2022
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत शानदार अर्धशतक आणि सहा बळी मिळवूनही रविचंद्रन अश्विन याला एका स्थानाचे नुकसान झाले व तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. गोलंदाजांच्या क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानी कायम आहे.
विराट-पंतला फायदा तर रोहितला नुकसान
मोहाली कसोटीत ९६ धावांची दमदार खेळी करणाऱ्या रिषभ पंतला नव्या क्रमवारीत फायदा झाला व तो पहिल्या दहामध्ये पोहोचला. विराट कोहली याने देखील या सामन्यात ४५ धावांची खेळी केली. यासह तो पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला. या सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माला दोन स्थानांचे नुकसान झाले. तो फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानी घसरला आहे.
कसोटी फलंदाजांच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन खेळाडू पहिल्या स्थानावर कायम आहेत. फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅब्युशेन तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)