---Advertisement---

रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा जलवा दिसला. जडेजानं शानदार रनआऊट करत तीन गडी देखील बाद केले. यामुळे न्यूझीलंडचा डाव 255 धावांवर आटोपला.

जडेजाच्या या रन आऊटनं चाहत्यांना एमएस धोनीची आठवण करून दिली. जड्डूनं मैदानावर धोनीसारखं चातुर्य दाखवलं. न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियानं घरच्या मैदानावर केवळ एकदाच 300 हून अधिक धावांचं लक्ष्य पार केलं आहे.

70 व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सनं कव्हर्सच्या दिशेनं एक शॉट खेळला. दरम्यान, तिथे तैनात असलेला वॉशिंग्टन सुंदर क्षेत्ररक्षण करताना थोडा संथ दिसत होता. मात्र किवी फलंदाज दोन धावा घेत आहेत, हे पाहून त्यानं जडेजाच्या दिशेनं वेगानं थ्रो केला. जडेजा तोपर्यंत सुंदरच्या क्षेत्ररक्षणावर नाराज दिसत होता.

जडेजाकडे थ्रो येताच त्यानं चेंडू पकडण्याऐवजी तो विकेटच्या दिशेनं ढकलला आणि रनआऊटसाठी अपील केलं. जडेजाची ही हुशारी पाहून विराट कोहलीलाही आश्चर्य वाटलं. अंपायरनं ताबडतोब निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला आणि त्यांना चेंडू विकेटला लागल्यावर फलंदाज क्रीझबाहेर असल्याचं आढळलं. अशाप्रकारे जडेजानं किवी फलंदाजाला अत्यंत हुशारीनं धावबाद केलं. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

या सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 259 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. आता न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 255 धावा करत भारताला 359 धावांचं मोठं लक्ष्य दिलं आहे.

हेही वाचा – 

IND vs NZ: पुण्यात वॉशिंग्टनचा ‘सुंदर पराक्रम’, 11 विकेट्स घेत खास क्लबमध्ये प्रवेश
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी या 3 दिग्गज खेळाडूंकडे दुर्लक्ष, कारकीर्द संपली?
टीम इंडियात सर्व काही ठीक नाही का? मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान का मिळालं नाही?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---