---Advertisement---

जड्डूच्या बुलेट थ्रोने स्मिथच्या शतकी खेळीचा अंत, व्हिडिओ पाहून कराल कौतुक

On: शुक्रवार, जानेवारी 8, 2021 12:15 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजचा तिसरा कसोटी सामना चालू आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्मिथ याने त्याच्या संयमी फलंदाजीचा नमुना दाखवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने बचावात्मक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. संघाने ९ विकेट्स गमवल्यानंतरही स्मिथ संघसहकारी जोश हेजलवुडसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात डावातील १०६वे षटक टाकण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आला.

बुमराहच्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्मिथने शॉट मारला आणि त्याने एक धाव पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी तो वेगाने धावत होता. तेवढ्यात जडेजाने चेंडू पकडला आणि निशाना साधत जोराने चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला. अशात स्मिथची दुसरी धाव काही अंतराने हुकली आणि तो धावबाद झाला.

https://twitter.com/Naveen99688812/status/1347392326637809667?s=20

https://twitter.com/PatelRon9/status/1347391284042899456?s=20

https://twitter.com/TangledWithYou_/status/1347391455577313282?s=20

जडेजामुळे स्मिथच्या रुपात भारतीय संघाला महत्त्वपुर्ण अशी दहावी विकेट मिळाली. स्मिथ २२६ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने १३१ धावा करत पव्हेलियनला परतला. हे स्मिथचे सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिले शतक ठरले. यापुर्वी झालेल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्मिथला १० धावांचा आकडाही गाठू दिला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Live : रोहित-गिलची चांगली सुरुवात; दुसऱ्या सत्राखेर भारताच्या बिनबाद २६ धावा

चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच

व्हिडिओ : जडेजाच्या फिरकीत फसला लॅब्यूशाने, रहाणेने टिपला लाजवाब झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---