गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत सामना जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने घातक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. आपल्या या शानदार कामगिरीनंतर सामन्यानंतर बोलताना त्याने आपल्या यशाचे गमक सांगितले.
आशिया चषक स्पर्धेनंतर जडेजा प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली. मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ या प्रमुख फलंदाजांसह त्याने 22 षटकात 47 धावा देत 5 गडी बाद केले. त्याने आपल्या कारकिर्दीत अकराव्या वेळी 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली.
या कामगिरीनंतर बोलताना तो म्हणाला,
“मागील काही महिने अवघड गेले. ज्यावेळी मी तंदुरुस्त होऊन बेंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आलो तिथे खूप मेहनत घेतली. मी दिवसात रोज 10-12 तास सराव करायचो. आपली लय मिळवण्याचा प्रयत्न माझा होता. कारण, कसोटी खेळताना मोठे स्पेल टाकावे लागतात.”
पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल सांगायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन डावात माघारी परतल्यानंतर स्मिथ व लॅब्युशेन यांनी भागीदारी केली. मात्र, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच रवींद्र जडेजा याने आपल्या फिरकीचे जाळे विणत ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळवला. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर, भारतासाठी जडेजा आणि पाच व अश्विनने तीन बळी मिळवले. त्यानंतर भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 77 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा नाबाद 56 धावा करून मैदानावर उभा आहे. तर, नाईट वॉचमन रविचंद्रन अश्विन त्याला साथ देतोय.
(Ravindra Jadeja Said I Practice Daily 10 To 12 Hours In NCA)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन पाहून संतापला स्टीव्ह वॉ, म्हणाला, “निवडसमितीचे डोके…”
नाद करा पण अश्विनचा कुठं! 300 असो किंवा 450, भारताकडून त्यानेच घेतल्यात सर्वात जलद विकेट्स