दुखापती नेहमी खेळाडूंच्या मार्गातील अडथळा ठरताना दिसतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजालाही पहिल्या टी२० सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पुढील २ टी२० सामने आणि पहिला कसोटी सामना खेळायला मिळाला नाही. परंतु आता जडेजा पूर्णपणे दुखापतीतून सावरल्याचे समजत आहे. अशात जडेजाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
जडेजाच्या फोटोमुळे शास्त्री का झाले ट्रोल?
झाले असे की, जडेजाने सोमवारी (२१ डिसेंबर) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये जडेजा कॉफी पिताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत जडेजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कॉफी, कारण वाइन पिण्यासाठी ही योग्य वेळ नाही.”
जडेजाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांना शास्त्रींची आठवण झाली. त्यामुळे “जडेजाने शास्त्रींपासून दूर रहावे,” अशा प्रतिक्रियांचा चाहत्यांनी भडीमार केला. शास्त्री यांना वाइन पिण्याची सवय असल्याचे बऱ्याचदा दिसून आले आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्याने वाइन पितानाचे फोटोही जोरदार व्हायरल झालेले पाहायला मिळतात. कदाचित याच कारणामुळे चाहत्यांनी जडेजाच्या पोस्टववरुन शास्त्रींना ट्रोल केले असल्याची शक्यता आहे.
Coffee, because it’s too early for wine.😜 pic.twitter.com/4RsQlhBuiL
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 21, 2020
Bhai Shastri se dur raha kro
— Shubham (@edgbaston__149) December 21, 2020
https://twitter.com/DineshBijarni17/status/1340939491884691456?s=20
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता
जडेजाला ४ डिसेंबर रोजी कॅनबेराच्या मनुका ओव्हल स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात दुखापत झाली होती. जडेजाच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली होती. दुसऱ्या टी२० सामन्यातील शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना जडेजाच्या हेल्मेटलवर चेंडू लागला होता. त्यामुळे जडेजाने क्षेत्ररक्षण केले नाही. त्याच्याऐवजी त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (दुखापतीमुळे आलेला बदली खेळाडू) म्हणून युझवेंद्र चहल क्षेत्ररक्षणासाठी आला होता.
परंतु आता जडेजा दुखापतीतून पूर्णपणे सावरला असल्यामुळे तो २६ डिसेंबर-३० डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात हनुमा विहारीच्या जागी जडेजाला संधी देण्यात येईल.
याविषयी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “अष्टपैलू जडेजा दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यामुळे विहारीऐवजी त्याला खेळवण्यात येईल. जडेजाला संधी दिल्यामुळे भारतीय संघाला सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू उपलब्ध होईल. त्यामुळे संघ पाच गोलंदाजांसह खेळेल. दुसरीकडे जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे, म्हणून संघाचे क्षेत्ररक्षणातील प्रदर्शनही सुधारेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
मोठी बातमी! भारताला जोरदार धक्का, रवींद्र जडेजा झाला दुखापतग्रस्त
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’