वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (5 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 243 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाचे विश्वचषकातील पहिले स्थान कायम झाले. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली याने विक्रमी 49 वे वनडे शतक झळकावले. तर, रवींद्र जडेजा याने पाच बळी मिळवले. विराट कोहली याला या सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार देण्यात आला. जडेजादेखील यासाठी दावेदार होता. सामन्यानंतर बोलताना जडेजा याने आपली प्रतिक्रिया दिली.
आतापर्यंत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेल्या जडेजाने या सामन्यात भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पाच प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासाठी त्याने केवळ 33 धावा खर्च केल्या. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती. खेळपट्टीवर चेंडू वळत होता मात्र जास्त बाऊंस नव्हता. भारताने उभ्या केलेल्या या मोठ्या धावांचे श्रेय विराट आणि मधल्या फळीतील फलंदाजांना द्यायला हवे. त्यांनी याचा यशस्वी सामना केला. हे एक खास शतक होते. येथे 270 ही खूप मोठी धावसंख्या होती.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे शतक व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा व जडेजा यांनी देखील महत्त्वपूर्ण खेळ्या केलेल्या. नंतर गोलंदाजी करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 83 धावावर गुंडाळत 243 धावांनी विजय संपादन केला.
(Ravindra Jadeja Speaks After Win Over South Africa)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त