रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली. या अनुभवी क्रिकेटपटूच्या निवृत्तीच्या निर्णयाने अष्टपैलू रवींद्र जडेजालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. जडेजाने सांगितले की, तो दिवसभर अश्विनसोबत होता, पण पाच मिनिटांपूर्वीच त्याला त्याचा निर्णय कळला. अश्विनच्या बदलीबाबतही त्याने मोठी गोष्ट सांगितली आहे. पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
जडेजाने शनिवारी एमसीजी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मला पत्रकार परिषदेच्या केवळ पाच मिनिटे आधी त्याच्या निवृत्तीची माहिती मिळाली. हे धक्कादायक होते. आम्ही संपूर्ण दिवस एकत्र घालवला आणि त्याने मला कोणताही इशारा दिला नाही. मला हे शेवटच्या क्षणी कळले. अश्विनचे मन कसे काम करते हे आम्हा सर्वांना माहित आहे”. जडेजाचे अश्विनसोबत चांगले संबंध होते. त्याने अश्विनचे ’ऑन-फिल्ड मेंटर’ असे वर्णन केले. अश्विनच्या निवृत्तीनंतर तरुणांनी आता या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांचे मत आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीत 106 कसोटी सामने खेळले आणि 537 विकेट घेतल्या.
पुढे बोलताना जडेजा म्हणाला, “तो माझ्या ऑन-फिल्ड मेंटॉरसारखा आहे. आम्ही इतकी वर्षे एकत्र खेळलो. आम्ही मैदानावर एकमेकांना मॅचची परिस्थिती, बॅट्समन काय करण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल संदेश देत असूतो. पण आता मला या सर्व गोष्टींची उणीव भासेल. आम्हांला अश्विनपेक्षा चांगला अष्टपैलू आणि गोलंदाज मिळेल अशी आशा आहे”.
जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. फॉलोऑन टाळून सामना अनिर्णित ठेवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. गाबाच्या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे जडेजाने सांगितले. तो म्हणाला, “संघ कठीण स्थितीत असताना चांगली कामगिरी करणे तुम्हाला आत्मविश्वास देते. एमसीजी कसोटीबाबत तो म्हणाला, “मानसिकता तशीच राहील. तुम्हाला सामन्यातील परिस्थितीनुसार खेळावे लागेल आणि मला जी भूमिका सोपवण्यात आली आहे त्यानुसारच मी खेळेन.”
हेही वाचा-
विराट कोहली, रोहित शर्मापासून आर अश्विनपर्यंत, हे 12 भारतीय 2024 मध्ये निवृत्त, पाहा संपूर्ण यादी
IND VS AUS; ‘मोहम्मद सिराज’ला वगळून रोहित-गंभीरने मोठी चूक करू नये, कारण ….
टीम इंडियाच्या या फलंदाजाने 2024 गाजवले, टी20 मध्येही कहर कामगिरी