वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे. चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या आहेत. फलंदाजांना धावा कुटताना संघर्ष करावा लागत आहे. अशात भारताचा स्टार गोलंदाज रवींद्र जडेजा याने सहाव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मार्नस लॅब्युशेन याला तंबूच्या दिशेने चालतं केलं. त्यानंतर त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर नवीन फलंदाज ऍलेक्स कॅरे यालाही पायचीत बाद केले. त्यामुळे भारत मजबूत स्थितीत दिसत आहे.
जडेजाने 9 चेंडूत घेतल्या 3 विकेट्स
ऑस्ट्रेलिया संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या स्टीव्ह स्मिथ हा टिच्चून फलंदाजी करत होता. मात्र, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने त्याला बाद करून तंबूत पाठवलं. यावेळी स्मिथला 46 धावांवर पव्हेलियनमध्ये परतावे लागेल. स्मिथची विकेट जडेजाने 28व्या षटकातील पहिल्या चेंडूवर घेतली.
And now the wicket of Alex Carey who is out L.B.W ☝️
Ravindra Jadeja gets his third wicket 💪#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue https://t.co/sENFdrH6Jm
— BCCI (@BCCI) October 8, 2023
स्मिथची विकेट घेतल्यानंतर जडेजा डावातील 30वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी जडेजाने 27 धावांवर खेळत असलेल्या मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याला दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल (KL Rahul) याच्या हातून झेलबाद केले. तसेच, तिसरा चेंडू निर्धाव टाकत चौथ्या चेंडूवर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा नवीन फलंदाज ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याला पायचीत बाद केले. कॅरे यावेळी 2 चेंडू खेळला पण त्याला खाते न खोलता शून्यावर तंबूत परतावे लागले. अशाप्रकारे जडेजाने स्मिथच्या विकेटपासून 9 चेंडू टाकत फक्त 3 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
W, 1, 0, 0, 1, 0, 1, W, 0, W by Jadeja in the last 9 balls.
– SIR JADEJA. pic.twitter.com/D70zMV6JVM
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाचा डाव
जडेजाने 3 विकेट घेतल्यानंतर 30 षटकात ऑस्ट्रेलिया संघाच्या एकूण 5 विकेट्स पडल्या. यापूर्वी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. 30 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने धावफलकावर 119 धावा लावल्या होत्या. (Ravindra Jadeja Takes Marnus Labuschagne And Alex Carey Wicket in ODI World Cup 2023 5th Match)
हेही वाचा-
जडेजाच्या फिरकीपुढे स्मिथ निरुत्तर! पाहा कसा उडवला दिग्गजाचा त्रिफळा
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर