नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला होता. येत्या २६ डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. बुधवारी (८ डिसेंबर) या मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले नाहीये. त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला मुंबई कसोटीत स्थान देण्यात आले नव्हते. तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्याला लिगमेंट टीयरचा त्रास आहे. ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील संधी देण्यात आली नाहीये. जर त्याला दुखपतीवर शस्त्रक्रिया करावी लागली. तर त्याला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागु शकते.
न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाच्या जागी जयंत यादवला संधी देण्यात आली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, त्याची दुखापत गंभीर आहे. तसेच त्याच्यासोबत खेळणाऱ्या एका मित्राने म्हटले की, “नुकतीच आमची चर्चा झाली होती. तो दीर्घ काळ वनडे क्रिकेट, टी२० क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो.”
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जर रवींद्र जडेजा पूर्णपणे फिट झाला नाही, तर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होऊ शकतो. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जर तो एप्रिल-मे पर्यंत फिट झाला नाहीतर त्याला आयपीएल स्पर्धा खेळता येणार नाही. चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला १६ कोटी रुपयात रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार