आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनवर खेळला जाणार आहे. तिथे भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आपला पहिला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्याकरिता एकमेकांविरुद्ध लढतील. या अंतिम सामन्यासाठी फक्त काही तासांचा अवकाश असून क्रिकेट रसिक या सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून आपला हेतू स्पष्ट केला आहे, परंतु भारतीय संघाकडे देखील अनेक धुरंधर खेळाडू आहेत ज्यांवर सगळ्यांची नजर असेल. त्यातलाच एक प्रमुख खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा होय. हा अंतिम सामना जडेजासाठी खास ठरणार असून त्याला मोठी कामगिरी करण्याची देखील संधी आहे.
फक्त हव्यात 46 धावा
कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाच्या नावावर 51 सामन्यांत 1954 धावा आणि 220 बळी आहेत. याचा अर्थ तो कसोटीत 2000 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या भारतीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्थान प्राप्त करेल. वास्तविक अशी कामगिरी करणारा तो फक्त 5 वा भारतीय खेळाडू ठरु शकतो.
कमी सामन्यांत अशी कामगिरी करण्याची संधी-
कसोटीत 2000 धावा आणि 200 पेक्षा अधिक बळी घेण्याचा कारनामा यापूर्वी अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंग आणि आर अश्विन यांनी केला आहे. तसेच जर जडेजाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 46 धावा केल्या तर तो इयान बोथम(42), इमरान खान(50), कपिल देव (50) आर अश्विन (51 कसोटी) यांच्यानंतर सर्वात कमी कसोटीत 2000 धावा आणि 200 पेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणारा चौथा खेळाडू ठरणार आहे.
रिचर्ड हेडलीने 54 कसोटीत, शॉन पोलाकने 56 तर न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिस केन्सने 58 कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली आहे.
भारताचा प्रमुख शिलेदार रवींद्र जडेजा
क्रिकेटच्या सर्वच प्रकारातील भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून जडेजा ओळखला जातो. फक्त गोलंदाजीतच नाही तर कठीण समयी तो फलंदाजीत देखील उपयुक्त कामगिरी करीत मोलाचे योगदान देत असतो. मागील तीन वर्षात त्याची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 36.19 आहे. तीन वर्षांपूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यावरील ओव्हल कसोटीनंतर जडेजाने मागे वळून बघितलेले नाही. वर्तमान क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून जडेजाची गणना केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार