भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा मागील पाच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आशिया चषक स्पर्धेवेळी झालेल्या दुखापतीतून तो अद्यापही सावरताना दिसतोय. त्याला पुन्हा एकदा मैदानावर पाहण्यासाठी चाहते आसुसलेले आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. पुढील दोनच दिवसात जडेजा पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसेल.
जडेजा याला आशिया चषकाच्या साखळी फेरीवेळी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो टी20 विश्वचषकातही सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर झालेल्या कोणत्याही मालिकेत तो दिसलेला नाही. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. मात्र, त्याआधी त्याला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्याच दृष्टीने आता जडेजा मैदानात उतरताना दिसेल.
https://www.instagram.com/reel/CnmBsHyPg9s/?igshid=YmMyMTA2M2Y=
जडेजा रणजी ट्रॉफी 2022-2023 च्या अखेरच्या साखळी सामन्यासाठी सौराष्ट्र संघात सामील झाला आहे. तमिळनाडूविरुद्ध चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यात तो खेळताना दिसेल. सौराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक निरज यांनी तो हा सामना खेळणार असल्याचे सांगितले आहे. याच सामन्याद्वारे तो आपली तंदुरुस्ती सिद्ध करेल. या सामन्यात जडेजाव्यतिरिक्त कर्णधार जयदेव उनाडकत व अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हेदेखील सौराष्ट्र संघाचा भाग असतील. हे तीनही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सुरू होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Ravindra Jadeja Will Play Ranji Trophy Match For Proving His Fitness For Team India Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जुडवा! स्वत:सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सुनील नारायणही झाला हैराण, पाहा व्हिडिओ
भारत- न्यूझीलंडसाठी ‘करो वा मरो’ सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून