गुजारत विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (8 डिसेंबर) लागला. भारतीय जनाता पार्टी गुजरातमध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याची पत्नी रवाबा देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. जडेजाचे चाहते आणि मतदार रिवाबा ही निवडणूक जिंकणार की पराभूत होणार यासाठी उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अशातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. गुरुवारी निकालाच्या दिवशी रिवाबाने तिच्या विरोधकांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे. अशात विरोधकांसाठी आता रिवाबाला पढाडणे सोपे नसेल. विजय मिळवण्यासाठी रिवाबाला स्वतःला देखील पूर्ण आत्मविश्वास असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने मतदार भाजपसोबत असल्याचे म्हटले आहे.
रिवाबा म्हणाली की, “गुजरातमध्ये भाजप मागच्या 27 वर्षांपासून सत्तेत आहे. पक्षाने याठिकाणी ज्या पद्धतीने विकासाचे एक मॉडेल तयार केले आहे, जनता देकील भाजपसोबत आहे. भाजप आणि मतदार मिळून राज्याला पुढे घेऊन जाईल.” रिवाबा पुढे असेही म्हणाली की, गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि भविष्यात देखील परिस्थिती अशीच असेल. “लोकांनी मला उमेदवाराच्या रूपात आनंदात स्वीकरले आहे. माझा प्रचार केला आणि त्या सर्वांचे धन्यवाद. हा फक्त माझा नाही, तर आपल्या सर्वांचा विजय आहे.” निवडणूक अधिकारी रुझान यांच्या माहितीनुसार रिवाबा तब्बल 31000 मतांनी आघाडीवर आहे.
दरम्यान, जडेजाच्या पत्नीने मागच्या तीन वर्षांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी तिने करणी सेनासोबत काम केले होते. तसेच अनेक सामाजिक संघटनांसाठीही कार्यरत राहिली आहे. असे असले तरी, विधानसभा निवडणूक लढण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. पती रविंद्र जडेजाने पत्नीसाठी वेळ काढून जोरदार प्रचार केला. मात्र, घरातील इतर व्यक्तींकडून मात्र तिला साध मिळाली नाही. जडेजाची बहीण नैना आणि आणि वडील अनिरुद्ध सिंग यांनी रिवाबाचे विरोधक आणि काँग्रेस उमेदवार बिपेंद्र सिंग यांच्या प्रचार केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही खेळपट्टी कसोटीच्या लायकीची नाही’, इंग्लंडकडून पराभूत होताच रिझवानची पिचवर आगपाखड
‘…म्हणून आम्ही भारताला हरवू शकलो’, बांगलादेशच्या शतकवीराचा मोठा खुलासा