आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी चांगली झाली आहे. बेंगलोर संघाने आतापर्यंत त्यांचे झालेले दोन सामने जिंकले आहेत. त्यांचा तिसरा सामना रविवार, दिनांक १८ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्स संघात सामील झाला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेला डॅनियल सॅम्स याचा ७ एप्रिलला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचा चेन्नईमध्ये हॉटेलमध्ये आल्यानंतर पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. पण काही काळाने त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच तो वैद्यकीय पथकाच्या संपर्कात होता. ते बीसीसीआयच्या नियामांनुसार त्याच्या आरोग्यावर नजर ठेवून होते.
पण आता तो या आजाराला मात देऊन संघात परतला आहे. याबाबत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने माहिती दिली आहे.
आरसीबीने शनिवारी माहिती देत म्हटले आहे की, “कोविड -१९ च्या निगेटिव्ह अहवालासह अष्टपैलू डॅनियल सॅम्स १७ एप्रिल २०२१ रोजी आरसीबीच्या बायो-बबलमध्ये सामील झाला आहे, हे सांगण्यात आम्हाला आनंद होत आहे. वैद्यकीय पथक त्यांच्याशी सतत संपर्कात होते आणि बोर्डाच्या नियमांअंतर्गत तपासणीनंतर त्याला संघात सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे.”
डॅनियल सॅम्सची टी२० कारकिर्द
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला डॅनियल सॅम्सचा टी२० मधील उत्तम. त्याने आतापर्यंत ५४ टी२० सामने खेळले आहेत. यात २ अर्धशतकांसह ४८५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४८ आहे. गोलंदाजीमध्ये सॅम्सने २२.१७ च्या सरासरीने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने दोन वेळा एका डालात ४ बळी घेतल्या आहेत.
मात्र, आयपीएलमधील त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. मागील हंगामात, तो दिल्लीकडून ३ सामने खेळला आणि त्याने एकही बळी घेतला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! असे झाले तर ऑलिंपिकमध्ये खेळताना दिसणार भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ
संपूर्ण यादी: आत्तापर्यंत ‘हे’ १२ क्रिकेटर आयपीएलमध्ये झाले आहेत हिट विकेट; जडेजा, युवराजचाही समावेश