इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विराट कोहली याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, विराटला अडचणींचाही सामना करावा लागत आहे. आयपीएल 2023मधील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोरने 7 धावांनी विजय मिळवला, पण विराटला एका मोठ्या चुकीचा सामना करावा लागला. विराटचा संघ राजस्थानविरुद्ध निर्धारित वेळेत षटके संपवू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर आणि इम्पॅक्ट प्लेअरसह इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) याला कर्णधार म्हणून नेमले होते. मात्र, 23 एप्रिल रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये राजस्थानविरुद्ध षटकांची गती कमी राखल्यामुळे त्याला दंड बसला आहे. आयपीएलच्या आचार संहितेनुसार, षटकांंची गती कमी राखण्याचा हा त्याच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा आहे. विराटवर 24 लाख रुपयांचा दंड बसला आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक सदस्यावर 6 लाख रुपये किंवा सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आरसीबी संघ निर्धारित वेळेच्या एक षटक मागे होता. आरसीबीची ही षटकांची गती कमी राखण्याची हंगामातील दुसरी वेळ आहे. यापूर्वीही लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातही संघ एक षटक मागेच होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिस याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला होता.
प्रभारी कर्णधाराच्या भूमिकेत विराट कोहली
खरं तर, आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे, पण तो पूर्णत: फिट नाहीये. त्यामुळे तो फक्त फलंदाजीलाच मैदानात येतो. मैदानात नेतृत्व करण्याची जबाबदारी विराट कोहली निभावतो. आगामी काही सामन्यांमध्येही विराट ही जबाबदारी पार पाडताना दिसू शकतो. आरसीबीचा पुढील सामना बुधवारी (दि. 26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध आहे. (rcb and skipper virat kohli fined for second slow over rate offence against rajasthan royals ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वत: SRHचा कर्णधार 3 धावांवर झाला बाद, पण पराभवासाठी ‘या’ खेळाडूंना धरलं जबाबदार, म्हणाला…
सनरायझर्सच्या फलंदाजांची हाराकिरी! 145 धावांचा बचाव करताना दिल्लीचा सलग दुसरा विजय