इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील १६ वा सामना गुरुवारी (२२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात सहभागी होतात संपूर्ण आरसीबी संघाने एक विक्रम आपल्या नावावर केला.
अशी कामगिरी करणारा दुसरा संघ बनला आरसीबी
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच आरसीबी संघाच्या नावे एक खास विक्रम जमा झाला. आरसीबी आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा दुसरा संघ बनला. २००८ ते आजतागायत हे सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा मान मुंबई इंडियन्सकडे जातो. मुंबईने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०७ सामने खेळले आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी १९८ सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत.
आयपीएलची प्रसिद्ध फ्रेंचायझी आहे आरसीबी
आरसीबी आयपीएलमधील प्रसिद्ध फ्रेंचायझींपैकी एक आहे. आयपीएलच्या इतिहासातील पहिला सामना खेळण्याचा मान देखील संघाकडे जातो. आरसीबी आयपीएलमधील आपला चौदावा हंगाम खेळत असून, दुर्दैवाने त्यांना एकाही हंगामात विजेतेपद पटकावत आले नाही. आरसीबीने आत्तापर्यंत ३ वेळा स्पर्धेची अंतिम फेरी खेळली आहे.
दिग्गजांनी केले आहे प्रतिनिधित्व
आरसीबी संघाचे आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केले आहे. राहुल द्रविड या संघाचा पहिला कर्णधार होता. त्यानंतर अनिल कुंबळे, डॅनियल व्हेटोरी आणि सध्या विराट कोहली संघाचे नेतृत्व सांभाळतो. याव्यतिरिक्त डेल स्टेन, जॅक कॅलिस, ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम, जहीर खान, एबी डिव्हिलियर्स या सर्व खेळाडूंनी आरसीबीची जर्सी अंगावर चढवली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ (२२ एप्रिल २०२१ पर्यंत)
मुंबई इंडियन्स- २०७
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- २००
दिल्ली कॅपिटल्स- १९८
कोलकाता नाईट रायडर्स- १९६
पंजाब किंग्स- १९४
चेन्नई सुपर किंग्स- १८३
राजस्थान रॉयल्स- १६५
सनरायझर्स हैदराबाद- १२८
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर हास्य फुलले!! हैदराबादच्या विजयाच्या क्षणी मालकीण काव्या मारन झाली भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल
ब्रेकिंग! हैदराबादला मोठा धक्का; टी नटराजन उर्वरित आयपीएल २०२१ हंगामामधून बाहेर
हे काहीतरी भलतंच! विराट आपणच नाणेफेक जिंकलो हेच चक्क विसरला, पाहा मजेशीर व्हिडिओ