---Advertisement---

अखेर हास्य फुलले!! हैदराबादच्या विजयाच्या क्षणी मालकीण काव्या मारन झाली भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 9:01 PM
---Advertisement---

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांनी खेळलेल्या पहिल्या ३ सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. हा विजयाचा क्षण पाहून संघ मालकीण काव्या मारन भावूक झाल्याचे दिसून आले होते. हा फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिथी मारन यांची कन्या आहे. तिला अनेकदा स्टेडियममध्ये येऊन सनरायझर्स हैदराबाद संघाला समर्थन करताना पाहिले गेले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत होताना पाहून तिचे डोळे पाणावल्याचे दिसले होते.

मात्र, बुधवारी (२१ एप्रिल) पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर मात्र, तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरल्याचे दिसले. जेव्हा सनरायझर्स हैदराबाद संघाला जिंकण्यासाठी ११ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. तेव्हा बेअरस्टोने षटकार लगावला होता. हा षटकार मारल्यानंतर कॅमेरा जेव्हा काव्याकडे गेला तेव्हा ती भावूक झाल्याचे दिसून आले होते.

https://twitter.com/pant_fc/status/1384863101288423425

https://twitter.com/Naveen_kanithi/status/1384861163180134402

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय फसला. कारण संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मयंक अगरवाल याने २२ धावा केल्या तर शाहरुख खानने देखील २२ धावा केल्या होत्या. याव्यिरिक्त कोणाला ही साजेशी कामगिरी करण्यास यश आले नाही. पंजाब संघाने १९.४ षटकात सर्वबाद १२० धावा केल्या होत्या.

या १२१ धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून आलेले सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने ३७ धावा केल्या तर बेअरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. यासोबतच आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या विलियम्सनने नाबाद १६ धावा केल्या.हैदराबाद संघाने १८.४ षटकात हे आव्हान पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्याा – 

हे काहीतरी भलतंच! विराट आपणच नाणेफेक जिंकलो हेच चक्क विसरला, पाहा मजेशीर व्हिडिओ

भारतात ‘या’ ठिकाणी तब्बल ११,००० फूट उंचीवर बांधले जातेय क्रिकेट स्टेडियम, देशांतर्गत क्रिकेटसाठी ठरणार फायदेशीर

दीपक चाहरच्या दमदार कामगिरीनंतर बहीण मालतीने केकेआरबद्दल केली अशी काही कमेंट की प्रतिक्रियांचा पडला पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---