---Advertisement---

हैदराबादला मोठा धक्का; टी नटराजन उर्वरित आयपीएल २०२१ हंगामामधून बाहेर

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 8:49 PM
---Advertisement---
भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. हा हंगाम सुरु होऊन केवळ २ आठवड्याचाच कालावधी झाला आहे. अशातच सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मोठा धक्का देणारे वृत्त समोर येत आहे. आयपीएलमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करत असलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर झाला आहे.त्याने या हंगामात केवळ हैदराबादकडून पहिले २ सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याच्या गुडघ्याची दुखापत गंभीर झाल्याने तो हैदराबाकडून शेवटच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या दुखापतीबद्दल हैदराबादच्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही काळजी व्यक्त केली होती.

नटराजनला गुडघ्याची दुखापत ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली असण्याची तसेच त्यानंतर या दुखापतीने आयपीएलदरम्यान पुन्हा डोके वर काढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हैदराबादसाठी आयपीएल २०२१ ची खराब सुरुवात
हैदराबादसाठी २०२१ आयपीएल हंगामाची सुरुवात खराब झाली होती. त्यांना पहिल्या तीनही सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी चौथ्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

आयपीएल २०२० मुळे प्रकाशझोतात – 
टी नटराजन आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने या हंगामात भुवनेश्वर कुमारची कमी भरुन काढत हैदराबादकडून १६ आयपीएल सामन्यांत १६ बळी घेतले होते. या दरम्यान त्याची सरासरी ३१.५ अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक ६५-७० यॉर्कर चेंडू फेकले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही नटराजन चमकला
नटराजनने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. खरंतर त्याची या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पणाची संधी मिळाली. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने १ वनडे, ३ टी२० आणि १ कसोटी सामना खेळताना एकूण ११ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

हे काहीतरी भलतंच! विराट आपणच नाणेफेक जिंकलो हेच चक्क विसरला, पाहा मजेशीर व्हिडिओ

भारतात ‘या’ ठिकाणी तब्बल ११,००० फूट उंचीवर बांधले जातेय क्रिकेट स्टेडियम, देशांतर्गत क्रिकेटसाठी ठरणार फायदेशीर

दीपक चाहरच्या दमदार कामगिरीनंतर बहीण मालतीने केकेआरबद्दल केली अशी काही कमेंट की प्रतिक्रियांचा पडला पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---