आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात आज, म्हणजेच २६ मार्च रोजी होणार आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. या हंगामात ग्रुप स्टेजचे सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. याच कारणास्तव एका स्टेडियमवर अनेक संघ उपस्थित आहेत. अशात हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसके माजी कर्णधार एमएस धोनी आणि आरसीबीचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिस यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे.
आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) मागच्या आयपीएल हंगामापर्यंत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात सीएसकेचे प्रतिनिधत्व करत होता. मागच्या हंगामात डू प्लेसिस सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.
सीएसकेने त्याला रिटेन केले नव्हते, पण मेगा लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु, अखेर आरसीबीने त्याला ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले असल्यामुळे फाफ डू प्लेसिसच्या रूपात संघाला नवीन कर्णधार देखील मिळाला, तर दुसरीकडे आता धोनीनेही सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे. रवींद्र जडेजा सीएसकेचा नवीन कर्णधार बनला आहे.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1507385085976510477
हंगामाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी धोनी आणि डू प्लेसिस दोघेच नाही, तर सीएसके आणि आरसीबीचे इतरही खेळाडू एकमेकांना भेटले. फाफ डू प्लेसिसला त्याच्या जुन्या संघातील सहकाऱ्यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1507394066232889351
विराट-धोनीची भेट
सराव सत्रादरम्यान भारताचे दोन माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांचीही भेट झाली. धोनी आणि विराट अनेक वर्ष भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. धोनी भारताचा कर्णधार असताना विराटने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते आणि धोनीनंतरचा पुढचा कर्णधार देखील तोच बनला. धोनी ज्यावेळी भारताचे कर्णधारपद सोडले, तेव्हा विराट ही जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार होता.
https://twitter.com/RCBTweets/status/1507376585686798337
दरम्यान, हंगामातील पहिल्याच सामन्यात सीएसके त्याच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात सीएसके आणि केकेआर आमने सामने असतील. तर २७ मार्च रोजी आरसीबीच्या अभियानाची सुरुवात होईल. आरसीबीचा पहिला सामना पंजाब किंग्जसोबत असेल. सीएसके आणि आरसीबी या दोन संघात या हंगामात १२ एप्रिल आणि ४ मे रोजी दोन सामने खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केकेआरच्या ‘मॅच विनर’ वेंकटेशला WWE रेसलरकडून आयपीएलसाठी खास संदेश, पाहा काय म्हणाला?
माजी कर्णधार धोनीला फाफ डू प्लेसिसचा सलाम; म्हणाला, ‘मी भाग्यवान होतो, त्याला जवळून पाहू शकलो’






