---Advertisement---

‘फाफ आता माझ्यावर जळत असेल’, एकेकाळी डावाची सुरुवात करणाऱ्या सहकाऱ्याबद्दल असं का म्हणाला ऋतुराज?

On: मंगळवार, मे 3, 2022 3:52 PM
Faf-Du-Plessis-And-Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

चार वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर करणारा चेन्नई सुपर किंग्स हा बलाढ्य संघ यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात सुरुवातीला संघर्ष करताना दिसतोय. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी फक्त ३ सामन्यात त्यांना विजयाचं पाणी चाखता आले आहे. मात्र, उर्वरित ६ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मात्र, संघासोबतच खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आता चांगले पुनरागमन केले आहे.

रविवारी (दि. १ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सलामीवीर ऋतुराज गायकवाडने तब्बल ९९ धावांची वादळी खेळी केली. त्याने डेवॉन कॉनवेसोबत (७४ धावा) किल्ला लढवत पहिल्या विकेटसाठी तब्बल १८२ धावांची भागीदारी रचली होती. ही आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी होती. ऋतुराज आणि कॉनवे या जोडीने फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांचा सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वॉटसन आणि डू प्लेसिसची २०२२मधील सर्वोच्च भागीदारी
आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना पहिल्या विकेटसाठी शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस यांनी तब्बल १८१ धावांची भागीदारी रचली होती. विशेष म्हणजे, मागच्या हंगामात चेन्नई संघात असताना डू प्लेसिस आणि ऋतुराज डावाची सुरुवात करायचे. मात्र, आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात डू प्लेसिसला चेन्नई संघाने रिलीझ केले होते. त्यावेळी त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात घेत त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. आता तो बेंगलोर संघाला आयपीएलचे पहिले वहिले विजेतेपद जिंकून देण्याच्या प्रयत्नात आहे.

ऋतुराज गायकवाडचे डू प्लेसिसबद्दल वक्तव्य
सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडल्यानंतर ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या अधिकृत वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “हा विक्रम रचून खूपच छान वाटत आहे. आम्ही याची अपेक्षाच केली नव्हती. आम्हाला फक्त संघाला चांगली सुरुवात करून द्यायची होती. मला वाटते की, डू प्लेसिस नक्कीच माझ्यावर थोडा जळत असेल.”

ऋतुराजची आयपीएल २०२२मधील कामगिरी
आयपीएल २०२२मधील ऋतुराजच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २६.३३च्या सरासरीने २३७ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.

‘तीन सामन्यातच धुमाकूळ घातला’, केकेआरचा कर्णधार श्रेयसने ‘या’ खेळाडूला म्हटले फ्यूचर स्टार

मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी प्रशिक्षकाने निवडले ‘बेस्ट ५ टी२०’ खेळाडू, ‘या’ एका भारतीयाचा समावेश

किती गोड! इंग्लंडमध्ये पुजाराला चीयर करतेय ‘खास चाहती’, क्यूट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---