---Advertisement---

RCB vs DC; स्म्रीती मानधनाचे शानदार अर्धशतक! आरसीबीचा धमाकेदार विजय

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 10:49 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगमधील (Women Premier League 2025) चौथा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) संघात खेळला गेला. हा सामना कोताम्बी स्टेडियम वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात स्म्रीती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखालील बंगळुरूने दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आणि या स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्म्रीती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. दिल्लीने शफाली वर्माची विकेट लवकर गमावली पण मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या 59 धावांच्या भागीदारीने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. रॉड्रिग्जने 34 धावा केल्या, पण त्यानंतर संघाला मोठ्या भागीदारी रचण्यात संघर्ष करावा लागला. सारा ब्राइसने शेवटच्या षटकांमध्ये 23 धावा करून दिल्ली कॅपिटल्सना 141 धावांचा सन्मानजनक आकडा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

142 धावांचे धावांचे लक्ष ठेवून मैदानात उतरलेल्या आरसीबीसाठी कर्णधार स्म्रीती मानधना आणि डॅनिएल वायट यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही 107 धावांची सलामी भागीदारी करून बंगळुरूचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. वायटने 42 धावा केल्या, तर मानधनाने 81 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. 17व्या षटकात, रिचा घोषने षटकार मारून बंगळुरूला सलग दुसरा विजय मिळवून दिला. आता आरसीबीचा संघ 2 सामन्यांत 2 विजय मिळवून गुणतालिकेत 4 गुणांसह शीर्षस्थानी पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली की एबी डिव्हिलियर्स, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणाचे वर्चस्व? पहा आकडेवारी
चॅम्पियन्स ट्रॉफी धोक्यात? दहशतीच्या सावटाखाली क्रिकेट महोत्सव!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश मोठी लढत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---