2024 लोकसभा निवडणूकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. देशभरातून वेगवेगळे निकाल येत आहेत. सोशल मीडियासह सर्वत्र या निवडणूक निकालांचीच चर्चा आहे. मात्र, या सगळ्यामध्ये आरसीबीचे चाहतेही सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक न्यूज चॅनेलच्या यूट्यूब चॅनेलवर आरसीबीच्या चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत.
वास्तविक, सोशल मीडियावर अशा काही पोस्ट आल्या आहेत ज्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगितले जात आहेत. या वेगवेगळ्या चॅनेलच्या पोस्ट आहेत. तथापि, त्यांचा कमेंट्स बॉक्स आरसीबीच्या चाहत्यांनी भरलेला आहे. चाहते RCB-RCB लिहून या निवडणूक निकालाच्या व्हिडिओंवर कमेंट करत आहेत. काही चाहत्यांनी असंही म्हटलं आहे की, आयपीएल ट्रॉफी वगळता आरसीबी सर्वत्र आहे, जी त्यांना अद्याप जिंकता आलेली नाही.
RCB is everywhere. ???????? pic.twitter.com/Yo8zefYPuv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2024
RCB is everywhere except trophy
— Amit Shah (Parody) (@Motabhai012) June 4, 2024
जर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल बोललो तर या संघाचे चाहते जगभरात आहेत. आरसीबीनं आतापर्यंत आयपीएलचे एकूण 17 सीझन खेळले, परंतु त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. चाहत्यांना दरवर्षी त्यांच्याकडून अपेक्षा असतात, परंतु संघ प्रत्येक वेळी चाहत्यांना निराश करतो.
जर आपण चाहत्यांच्या संख्येबद्दल बोललो तर, क्वचितच इतर कोणताही आयपीएल संघ आरसीबीशी स्पर्धा करू शकेल. चाहते संघाला भरपूर पाठिंबा देतात. स्टेडियमपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र आरसीबीचे चाहते मोठ्या संख्येनं संघाला पाठिंबा देतात. मात्र असं असूनही आरसीबीनं एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबी संघ विजेतेपदाच्या जवळ आला होता. मात्र त्यांना प्लेऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. पहिल्या टप्प्यात आरसीबीची कामगिरी अजिबात चांगली नव्हती आणि त्यांना सलग 6 पराभवांना सामोरं जावं लागलं. यानंतर आरसीबीनं सलग 7 सामने जिंकून प्लेऑफमध्ये जागा मिळवली. मात्र, एलिमिनेटर सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आणि यासह त्यांचं आणखी एका हंगामात ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!






