गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. शुक्रवारी (दि. 31 मार्च) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यासह आयपीएल 2023 पुन्हा एकदा जुन्या प्रकारात खेळला जात आहे. यामध्ये एका संघाला आपल्या घरच्या मैदानावर 7 सामने खेळण्याची संधी मिळेल. यामुळे हंगाम रोमांचक होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आयपीएलमध्ये दीर्घ काळत आपल्या बॅटने वादळ आणणारा एबी डिविलियर्स हा समालोचकाची भूमिका साकारताना दिसत आहे.
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी मोठे भाष्य केले होते. त्याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकणाऱ्या 4 संघांच्या नावाची घोषणा केली.
कोणते आहेत ते 4 संघ?
एबी डिविलियर्सने जिओ सिनेमा (Jio Cinema) शोदरम्यान बोलताना या हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या 4 संघांची नावे सांगितली. त्याने यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Chellengers Bangalore) संघाव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स संघांची नावे घेतली.
गुजरात संघ पुन्हा दिसतोय मजबूत
मागील हंगामात पहिल्यांदाच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला खेळण्याची संधी मिळाली होती. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे होते. संघाने संपूर्ण हंगामादरम्यान एकतर्फी प्रदर्शन करत किताब आपल्या नावावर केला होता. पंड्याने चेंडू आणि बॅट दोन्ही विभागातून विजयी प्रदर्शन करत महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळीही गुजरात जेव्हा चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात उतरला, तेव्हा 5 विकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी झाला. महत्त्वाचं म्हणजे, गुजरातने चेन्नईला पराभूत करण्याची ही सलग तिसरी वेळ होती.
यापूर्वी आयपीएल 2022 हंगामात गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने-सामने आले होते. तेव्हाही गुजरातने चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता. आता यावेळीही पराभूत करत आपण मजबूत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. दुसरीकडे, आरसीबी संघाबाबत बोलायचं झालं, तर बेंगलोर रविवारी (दि. 2 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध स्पर्धेतील पाचवा सामना खेळेल. हा सामना बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. (rcb former cricketer ab de villiers picks his top 4 teams to reach ipl 2023 playoffs including rcb and csk)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने बिघडवला केकेआरचा खेळ! पंजाबची डकवर्थ-लुईस नियमामुळे 7 धावांनी विजयी सलामी
खेळाडूंपाठोपाठ कोच लक्ष्मणही महाकालेश्वराच्या पायाशी! सहकुटुंब घेतले दर्शन,छायाचित्रे व्हायरल