आयपीएल 2025 मेगा लिलाव होण्यास अजून बराच अवधी शिल्लक असला तरी, चाहते आणि फ्रँचायझींमध्ये याबाबतची चर्चा वेगाने सुरू आहे. अनेक फ्रँचायझी आपली रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. ते फक्त बीसीसीआयकडून रिटेंनशन नियम जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. यावेळी मेगा लिलावात अनेक युवा खेळाडू सर्व फ्रँचायझींचे लक्ष्य असतील. यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे.
अर्जुन तेंडूलकर त्याच्या धोकादायक गोलंदाजीसोबतच उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत तो फक्त आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण कदाचित यावेळी त्याचा संघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्जुन कर्नाटकमध्ये एका देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. ज्यामध्ये त्याने कर्नाटक इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात 9 विकेट्स घेत कहर निर्माण केला.
मेगा लिलावापूर्वी मुंबई अर्जुनला रिलीझ करेल अशी आशा आहे. अशा स्थितीत या युवा खेळाडूवर या वेळी अन्य अनेक संघांना बोली लावण्याचीॉ संधी मिळण्याची खात्री आहे. अर्जुनच्या खेळातही बरीच सुधारणा झाली आहे. या बातमीद्वारे आपण अश्या 3 संघांविषयी बोलणार आहोत.स जे आयपीएल 2025 मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला लक्ष्य करू शकतात.
3. पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. त्याचे प्रमुख कारण त्याची कमकुवत वेगवान गोलंदाजी देखील आहे. कागिसो रबाडा व्यतिरिक्त या संघातील इतर वेगवान गोलंदाज विकेट घेतात परंतु धावांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत नाहीत. या कारणास्तव पंजाब फ्रँचायझी या वेळी लिलावात त्याच्या मागे जाण्याची शक्यता आहे. अर्जुन तेंडुलकर तरुण आहे आणि थोड्याशा मार्गदर्शनाने तो आपल्या कामगिरी आणखी विविध काैशल्य निर्माण करु शकतो. तसेच पंजाब किंग्जला अर्जुनला सातत्यपूर्ण संधी देण्याची गरज आहे. यासोबतच अर्जुन फलंदाजीतूनही संघाला विजय मिळवून देऊ शकतो.
2. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
आयपीएलच्या आधीपासून आरसीबी या मेगा लीगचा एक भाग आहे, परंतु आजतागायत त्यांनी ट्रॉफी जिंकण्याची चव चाखलेली नाही. आरसीबी संघ गेल्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता, परंतु अंतिम फेरीत स्थान गमावले होते. आरसीबीकडे वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूचीही कमतरता आहे. जी अर्जुन तेंडुलकर भरून काढू शकेल. आरसीबीचे घरचे मैदान छोटे आहे. अर्जुन फलंदाजी करतानाही याचा फायदा घेऊ शकतो. त्याचबरोबर अर्जुनला खरेदी करण्यासाठी आरसीबीला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यामुळे मेगा लिलावात आरसीबी निश्चितपणे सचिनच्या मुलाला लक्ष्य करू शकते.
1. गुजरात टायटन्स
आयपीएल 2022 चा विजेता गुजरात टायटन्स देखील यावेळी नव्याने आपला संघ तयार करेल. हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यानंतर संघाचा संपूर्ण समतोल बिघडला. यावेळी गुजरात भविष्याचा विचार करून युवा खेळाडूंना संघाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जुन तेंडुलकरला विकत घेणे संघासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी मेगा लिलावापूर्वी, जीटी कदाचित केवळ मोहम्मद शमीला वेगवान गोलंदाज म्हणून कायम ठेवेल. अर्जुन संघाचा भविष्यातील स्टार खेळाडू बनू शकतो. आपल्या धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर तो संघाला दुसरे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत जयस्वाल रचणार इतिहास! विराटही आजपर्यंत करू शकला नाही हा पराक्रम
वर्तमान संघातून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
मोहम्मद शमीने उलगडले विश्वचषकातील शानदार गोलंदाजीचे रहस्य! पाहा कोणाला दिले श्रेय