---Advertisement---

IPL Mega Auction; मुंबईसाठी मैदान गाजवणारा खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात सामील

---Advertisement---

सध्या आयपीएल (IPL) मेगा लिलावाचा दुसरा दिवस सुरू आहे. त्यामध्ये अनके मोठ्या खेळाडूंवर मोठी लागली. दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) फिनीशरची भूमिका बजावणाऱ्या टीम डेव्हिडला (Tim David) आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केले. 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या टीम डेव्हिडला आरसीबीने अत्यंत कमी किमतीत खरेदी केले आहे. डेव्हिडला बंगळुरूने अवघ्या 3 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

टीम डेव्हिड (Tim David) शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग होता. त्याने मुंबईसाठी अनेक वेळा मैदान गाजवले आहे. पण आता आगामी आयपीएल हंगामात तो कोहलीच्या आरसीबी संघात खेळताना दिसणार आहे. शेवटच्या हंगामात त्याने मुंबईसाठी 13 सामने खेळले होते. दरम्यान त्याने 158.55च्या स्ट्राईक रेटने 241 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 30.13 राहिली होती. 2024च्या आयपीएल हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 45 राहिली होती.

टीम डेव्हिडच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलच्या इतिहासात 38 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 659 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 170.28 राहिला आहे. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 46 राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रुणाल पांड्यावर लिलावात लागली कोटींची बोली! ‘या’ संघातून खेळताना दिसणार
IPL 2025 : सॅम करनचा सीएसकेत कमबॅक, फाफ डू प्लेसिससोबत गेम झाला!
बुमराहची ऑस्ट्रेलियात मोठी कामगिरी, दुसऱ्या महायुद्धानंतर हा पराक्रम करणारा केवळ दुसराच गोलंदाज!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---