मुंबई। आयपीएल 2020 च्या सहाव्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 97 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 206 धावा केल्या. त्यानंतर 207 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला आरसीबी संघ 17 षटकांत सर्वबाद 109 धावा करू शकला. या सामन्यादरम्यान बरीच विलक्षण आणि मनोरंजक विक्रम झाले आहेत. त्या विक्रमावर एक नजर.
1. आरसीबीविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा 13 वा विजय होता. यापूर्वी या दोन संघांत एकूण 24 सामने खेळले गेले होते, त्यापैकी दोन्ही संघांनी 12-12 सामने जिंकले होते.
2. केएल राहुलने 69 चेंडूंत 132 धावांची नाबाद शतकी खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीचे दुसरे शतक आहे.
3. केएल राहुल कर्णधार म्हणून आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 126 धावा 2017 च्या हंगामात कर्णधार म्हणून केल्या होत्या.
4. केएल राहुलचे टी-20 क्रिकेट प्रकारामधील हे चौथे शतक आहे. त्याने आयपीएलमध्ये 2 शतके आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 शतके केली आहेत.
5. आयपीएलमध्ये केएल राहुल हा सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 2018 मध्ये रिषभ पंतने केलेल्या 128 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे.
6. टी-20 क्रिकेट प्रकारामध्येही केएल राहुलची ही सर्वोच्च धावसंख्या आहेत. यापूर्वी टी-20 मधील त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 110 धावा होती.
7. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याः
175 *: ख्रिस गेल विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, 2013
158 *: ब्रँडन मॅक्युलम विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, 2008
133 *: एबी डिव्हिलियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2015
132 *: केएल राहुल विरुद्ध आरसीबी, दुबई, 2020
129 *: एबीडी डिव्हिलियर्स विरुद्ध गुजरात लायन्स, बंगळुरू, 2016
8. आरसीबी संघाविरुद्ध आत्तापर्यंत 8 शतके ठोकण्यात आली आहेत. त्यामुळे या नकोशा विक्रमाच्या यातील त्यांनी केकेआरची बरोबरी केली आहे. केकेआरच्या संघाविरुद्धही आयपीएलमध्ये 8 शतके झाली आहेत.
9. आयपीएलमध्ये डावाच्या शेवटच्या 2 षटकांत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
44 (10 चेंडू) – कोहली विरुद्ध गुजरात लायन्स, 2016
42 (9 चेंडू) – केएल राहुल विरुद्ध आरसीबी 2020
39 (11 चेंडू) – ब्रँडम मॅक्युलम विरुद्ध आरसीबी, 2008
38 (9 चेंडू) – ख्रिस मॉरिस विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, 2017
38 (11 चेंडू) – मार्कस स्टोनिस विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, 2020
10. प्रत्येक आईपीएल हंगामातील पहिले शतक
2008: ब्रँडम मॅक्युलम
2009: एबीडी डिव्हिलियर्स
2010: यूसुफ पठान
2011: पॉल वॉल्थटी
2012: अजिंक्य रहाणे
2012: शेन वॉटसन
2014: लेंडन सीमन्स
2015: ब्रँडन मॅक्यूलम
2016: क्विंटॉन डी कॉक
2017: संजू सॅमसन
2018: ख्रिस गेल
2019: संजू सॅमसन
2020: केएल राहुल