भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा महाराजा ट्रॉफी टी२० पूर्वाश्रमीची कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये भारतीय खेळाडू धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मनिष पांडे, मयंक अगरवाल असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएल खेळलेले खेळाडू त्यांच्या प्रदर्शनाने कहर माजवत आहेत. अशातच आयपीएलमधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा यष्टीरक्षक फलंदाज लवनिथ सिसोदिया यानेही या स्पर्धेत झंझावाती खेळी केली आहे.
२२ वर्षीय सिसोदियाने (Luvnith Sisodia) महाराजा ट्रॉफीतील (Maharaj Trophy T20) १८व्या सामन्यात गुलबर्गा मिस्टिक संघाविरुद्ध मोठी खेळी केली आहे. अवघ्या ४ धावांनी त्याचे शतक हुकले. मात्र त्याच्या मोठेखानी खेळीच्या जोरावर हुबली टायगर्सने हा सामना ५ विकेट्सने जिंकला आहे.
गुलबर्गा मिस्टिक संघाने दिलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिसोदिया सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने सलामीला फलंदाजीला येत ५५ चेंडूत १७४.५५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ४ षटकार आणि १० चौकारही मारले. त्याने हुबली संघाकडून सलामीला फलंदाजीला येत डावाखेर झुंज दिली. तो मैदानावर टिकून असताना ५ फलंदाजांच्या विकेट्स गेल्या. मोहम्मद ताहा, नवीन एमजी, श्रीनिवास शरथ, तुषार सिंग, स्वप्निल येलवे हे फलंदाज बाद झाले. तरीही सिसोदिया मैदानावर टिकून राहिला. त्याने ९६ धावांची शानदार खेळी खेळत १९ षटकात संघाला विजय मिळवून दिला.
Luvnith Sisodia scored a brilliant 9️⃣6️⃣*(55) and helped Hubli Tigers chase down 178 against Gulbarga Mystics in the Maharaja T20 Trophy. 🙌🏻
Well played, champ! 👏🏻👏🏻@LuvnithSisodia1 | #PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/05RDCayVaP
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 16, 2022
दरम्यान सिसोदियाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २०२२ साठी मूळ किंमत २० लाखांना विकत घेतले होते. परंतु दुखापतीमुळे एकही सामना खेळण्यापूर्वीच तो या टी२० लीगमधून बाहेर झाला होता. त्यामुळे त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून रजत पाटीदारला संघात सहभागी करण्यात आले होते.
तत्पूर्वी महाराजा ट्रॉफी टी२० स्पर्धेत मयंक अगरवालनेही शतक केले होते. शिवमोग्गा संघाविरुद्ध मयंकने केवळ ४९ चेंडूत नाबाद १०२ धावा (Mayank Agarwal Century) चोपल्या. या दमदार शतकी खेळीसाठी त्याने ६ षटकार आणि १० चौकारही मारले. अर्थात केवळ बाउंड्रींच्या जोरावर त्याने ७६ धावा फटकावल्या. ही शतकी खेळी त्याने २०८.१६ च्या स्ट्राईक रेटने केली.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेतील पाणी समस्येमुळे टीम इंडिया हैरान! थेट खेळाडूंच्या अंघोळीवरच लादले नियम
आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!
‘सूर्यकुमार यादव अन् एबी डिविलियर्समध्ये फारसा फरक नाही’, तीन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा दावा