आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात असलेला दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर 360’ एबी डीविलियर्सने आयपीएल चषक पटकावण्याबाबत वक्तव्य केले आहे. आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याविषयी बोलणे हे खूप कंटाळवाणे असून चषक जिंकण्याव्यतिरीक्त आणखीही बऱ्याच खास गोष्टी आयपीएलमध्ये आहेत असे त्याचे म्हणणे आहे.
या 37 वर्षीय फलंदाजाने म्हटले आहे की, “मी खोटे नाही बोलत. आम्हालाही चषक जिंकण्याची इच्छा आहे, माझी सुद्धा चषक जिंकण्याची इच्छा आहे. चषक जिंकल्यानंतर मी काय प्रतिक्रिया देईन ते मला माहित नाही. पण आता त्याबद्दल बोलणे कंटाळवाणे आहे.”
आयपीएलमधील बंगळुरू संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकले नाही. याविषयी बोलताना पुढे तो म्हणतो की, “शेवटी चषक जिंकण्यामध्ये विशेष असे काही नाही. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांशी संबंध येतात. याचमुळे आयपीएल ही जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे.”
बंगळुरू संघाचे सामने त्यांचा घरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आले नसल्यामुळे संघाचा तोटा होईल का? असे विचारले असता तो म्हणाला की, “हे सर्व संघासाठी असून कुणालाही घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वातावरणात खेळावे लागेल.”
पुढे तो म्हणाला की, “सर्व सामने वेगवेगळ्या वातावरणात खेळले जात आहेत आणि खेळपट्टी जुनी होत असून एकाच खेळपट्टीवर आपल्याला वेगवेगळ्या संघासोबत सामने खेळायाचे आहेत. त्यामुळे वेगळी रणनीति आखून आपल्याला सामने खेळावे लागणार आहेत आणि हे सर्व संघांसाठीच आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीमागे कर्णधार कोहलीचा हात, पाहा कुणी केलंय हे भाष्य
तब्बल ६ फूट ८ इंच उंचीच्या गोलंदाजाला कॅप्टन कोहलीचे ‘हे’ गुण करायचे आहेत अवगत
दिनेश कार्तिकचा मोठा खुलासा, ‘या’ कारणामुळे गतवर्षी अर्ध्यातच सोडले होते केकेआरचे कर्णधारपद