---Advertisement---

आरसीबीच्या ‘या’ जबरदस्त गोलंदाजाची टी२० विश्वचषकातील जागा फिक्स? आयपीएलमध्ये करतोय कहर कामगिरी

On: बुधवार, एप्रिल 6, 2022 10:18 PM
RCB
---Advertisement---

आयपीएल २०२२च्या १३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने- सामने होते. हा सामना मंगळवारी (५ एप्रिल) खेळला गेला. अनुभवी दिनेश कार्तिकने जबरदस्त प्रदर्शन करून या सामन्यात आरसीबीला विजय मिळवून दिला. यादरम्यान आरसीबीचा गोलंदाजी अष्टपैलू हर्षल पटेलनेही सर्वांचे लक्ष्य वेधले. हर्षल आयपीएल २०२२मधील आतापर्यंतच्या सर्वात फायदेशीर गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. अशात आगामी टी२० विश्वचषकात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थान आणि बेंगलोर (RCB vs RR) यांच्यातील या सामन्यात हर्षल पटेल (Harshal Patel) याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये १८ धावा खर्च करून १ विकेट घेतली. यादरम्यान त्याची इकॉनॉमी ४.५० होती. खूप कमी गोलंदाज आहेत, जे आयपीएलमध्ये अशाप्रकारे गोलंदाजी करू शकतात. हर्षलने भारतीय संघासाठी आतापर्यंत खेळलेल्या ८ टी२० सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन २२ धावा खर्च करून ३ विकेट्सचे राहिले आहे. मागच्या आयपीएल हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विकेट्सची हॅट्रिकही घेतली होती.

यावर्षी खेळला जाणारा आयसीसी टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पार पडेल. आयपीएलच्या चालू हंगामात हर्षलने त्याच्या तुफान प्रदर्शनाने धुमाकूळ घातला आहे. अशात तो टी२० विश्वचषकात देखील भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो. तसे पाहिले, तर भारतीय संघाला येत्या काळात एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे.

भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या वर्षी टी२० विश्वचषकात अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. मागच्या आयपीएल हंगामातही त्याने निराशा केली होती. हार्दिक टी२० विश्वचषक २०२१ मध्ये गोलंदाजाच्या रूपात पूर्णपणे अपयशी ठरला होता आणि त्यानंतर त्याने काही काळ विश्रांतीही घेतली होती. दरम्यानच्या काळात स्वतःच्या फिटनेसवर कम केल्यानंतर हार्दिक पुन्हा गोलंदाजी करू लागला आहे, परंतु त्याला आता स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे.

आयपीएल २०२२ च्या प्रदर्शनावर ठरू शकते हर्षल पटेलचे भविष्य
अशात हर्षल पटेल हार्दिकला पर्यायी खेळाडू ठरू शकतो आणि आगामी टी२० विश्वचषकात चांगले प्रदर्शन करूनही दाखवू शकतो. हर्षल भारतीय संघाला एका चांगल्या गोलंदाजी अष्टपैलूचा पर्याय देत असल्यामुळे संघात चांगले संतुलन तयार होईल. आयपीएल २०२२मधील हर्षलचे प्रदर्शन पाहून बीसीसीआय आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड करण्याची शक्यता आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

“हार्दिकने चांगले प्रदर्शन केल्यावर मला वाटते, माझा मुलगा चांगला खेळतोय”

‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा

अभिमानास्पद क्षण! पती चहलने विकेट घेताच धनश्री वर्माचे ‘लय भारी’ सेलिब्रेशन; पाहून तुम्हालाही होईल आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---