भारतीय संघाचे रिषभ पंत आणि ईशान किशन हे दोघे चांगेले खेळाडू असून ते चांगले यष्टरक्षकही आहेत. यात कोणतीच शंका नाही. पण भविष्यात त्यांना आव्हान उभे राहू शकते. आरसीबीने या वर्षी त्यांच्या संघात मुळचा केरळचा असणारा मोहम्मद अजहरुद्दीन याला सामील केले आहे. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या अजहरुद्दीनने कर्णधार विराट कोहलीचा विश्वास जिंकला आहे. अजहरूद्दीन येणाऱ्या काळात रिषभ पंत आणि ईशान किशन यांची जागा घोऊ शकतो. त्याचे प्रदर्शन पाहूनच आरसीबीने त्याला संघासाठी २० लाखांच्या बेस प्राइसवर विकत घेतले आहे.
अझरुद्दीनने ३७ चेंडूत केलंय शतक
अजहरुद्दीनने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्राॅफी २०२१ मध्ये मोठी आणि धमाकेदार खेळी केली होती. त्याने केवळ ३७ चेंडूंमध्ये त्याचे शतक पूर्ण केले होते. त्याच्या या दमदार खेळीनंतर तो प्रकाशझोतात आला आणि आरसीबीनेही त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. त्याने या सामन्यात ५४ चेंडूत १३७ धावा पूर्ण केल्या होत्या. यामध्ये ९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.
आयपीएल सुरु होण्याआधीच दाखवली सर्वाना फलंदाजीची झलक
आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी आरसीबीने एक इट्रा स्क्वाड सामना खेळला होता. या सामन्यात अजहरुद्दीनने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ६६ धावा केल्या असून यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीने त्याने त्याच्या क्रिकेटमधील भविष्याची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केले आहे.
मागच्या काही काळापूर्वी मोहम्मद अजहरुद्दीनची ड्रीम लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या लिस्टमधील त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त रणजी ट्राॅफीमध्ये चार शतक आणि आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये खेळण्याचे स्वप्न अजून अपूर्ण असून भविष्यात अजहरुद्दीन त्यासाठी प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटीत जगापासून का ठेवले होते लपवून, शास्त्रींनी केला खुलासा
तब्बल चार वर्षानंतर तुटणार गुरू-शिष्याचं नातं, केली आहे संस्मरणीय कामगिरी