रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ वुमेंस प्रीमियर लीग 2024च्या बाद फेरीसाठी पात्र झाला आहे. मंगळवारी (12 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये हा सामना खेळला गेला. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ 7 विकेट्स राखून जिंकला आणि बाद फेरीत जागा पक्की केली. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सनंतर आता आरसीबी प्लेऑफ्समध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. एलिस पेरी आरसीबीसाठी मॅच विनर ठरली.
ग्रुप स्टेजमधील आपला पहिला सामना आरसीबीने मंगळवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला. विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य आरसीबीला मिळाले होते. 15 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर आरसीबीने हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला 113 धावांवर गुंडाळण्यात एलिस पेरी (Ellyse Perry) हिचे सर्वात महत्वाचे योगदान राहिले. पेरीने 4 षटकात 15 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. तसेच फलंदाजी करताना 38 चेंडूत सर्वाधिक 40* धावांची खेळीही तिनेच केली.
RCB QUALIFIED INTO THE PLAY-OFFS OF WPL 2024…..!!!!!! pic.twitter.com/dxKcFJ2egx
— Johns. (@CricCrazyJohns) March 12, 2024
आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 113 धावांवर सर्व विकेट्स घेतल्या. मुंबईसाठी सलामीला आलेल्या हेली मॅथ्यूज 26, तर सजीवन सजना हिने 30 धावांची खेळी केली. नेट सायवर ब्रांट अवघ्या 10, तर कर्णधार हरमनप्रीत कौर शुन्यावर बाद झाला. अमिलिया केर 2, अमनजोत कौर 4 आणि पूजा वस्त्राकार 6, हुमैरा काझी 4, शबनिम इस्माईल 8, तर सायका इशाक 1 धाव करून बाद झाली. प्रियांका पाला 19* धावांवर बाद झाली.
आरसीबीसाठी एलिस पेरीने 6 विकेट्स घेतल्या. सोफी मोलिनक्स, सोफी डिव्हाईन, आशा शोभना आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात आरसीबीसाठी स्मृती मंधाना हिने 11, सोफी मोलिनक्स 9, तर सोफी डिव्हाईन 4 धावा करून बाद झाले. एलिस पेरी 40, तर रिचा घोष 36 धावांसह नाबाद राहिल्या. मुंबईसाठी शबनिम इस्माईल, हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा मोठा प्लॅन! विराटविषयी बातमी वाचून नाही बसणार विश्वास
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा! रणजी फायनलसाठी सचिन-रोहितची वानखेडेत हजेरी, सोशल मीडियावर चर्चा