आयपीएल 2023 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमनेसामने आले. मोहली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वादळी फटकेबाजी गेली. संघाचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस या सामन्यात केवळ फलंदाज या नात्याने उतरला. मात्र त्याने आपली ही जबाबदारी देखील चोख पार पाडताना संघासाठी सर्वाधिक धावा बनवल्या. त्याने आतापर्यंत या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घालत ऑरेंज कॅप आपल्याच डोक्यावर ठेवली आहे.
चेन्नईविरुद्ध झालेल्या नजीकच्या पराभवानंतर आरसीबीने या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार बनवले. नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस केवळ कर्णधार म्हणून या सामन्यात खेळताना दिसला. आतापर्यंत स्पर्धेत स्वप्नवत फॉर्ममध्ये असलेल्या प्लेसिसने सलामीला उतरत विराट कोहलीसह संघाला शतकी भागीदारी रचून दिली. दोघांनी 16.1 षटकात 137 धावा संघाला सलामीलाच चोपून दिल्या.
प्लेसिसने येडावत आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करताना 56 चेंडूवर 84 धावा कुटल्या. यामध्ये प्रत्येकी पाच चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. या संपूर्ण हंगामात त्याची बॅट चांगलीच बोलताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळताना त्याने 43 चेंडूवर 73 धावा केल्या होत्या. त्यानंतर केकेआरविरुद्ध त्याला 23 धावा करण्यात यश आलेले. लखनऊविरुद्ध तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपला प्रभाव पाडताना 79 धावांची खेळी केली होती. दिल्लीविरुद्ध त्याची सर्वात निच्चांकी 22 धावा त्याने केल्या. चेन्नईविरुद्ध पाठीची दुखापत असताना देखील 33 चेंडूंवर 62 धावा त्याने केलेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने आता अर्धशतक साजरे करत आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले.
त्याच्या नावे आत्तापर्यंत या हंगामात सहा सामन्यांमध्ये 343 धावा करताना ऑरेंज कॅप आपल्याकडे राखली आहे. यादरम्यान त्याची सरासरी 68.6 तर स्ट्राईक रेट 168 पेक्षा जास्त राहिला आहे.
(RCB Skipper Faf Du Plessis Prime Form Continue Hits Another Half Century Against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी
कॅप्टन्सी सोडल्यानंतर 566 दिवसांनी विराट पुन्हा बनला कर्णधार, ‘या’ कारणामुळे सांभाळली संघाची धुरा